वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, स्टीमरचे वाटप
सिटी बेल लाइव्ह / पेण शहर (प्रशांत पोतदार) :
पेण प्रेस क्लबचे उपाध्यक्ष, साज मराठी चॅनलचे निर्माते व स्वररंग संस्थेचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांचा वाढदिवस सोमवार (दि १७ ) रोजी विविध सामाजिक उपक्रमांंने साजरा करण्यात आला.सुनील पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने रुग्णांना फळवाटप, पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता विविध प्रकारच्या वृक्षांचेरोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोना संकटाविरुद्ध लढण्यासाठी प्रथोमपचार म्हणून वाफारा घेण्याकरिता स्टीमर व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला पेण न.पा सभापती निवृत्ती पाटील, उद्योजक यशवंत घासे, ऍड.पुष्कर मोकल, अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, जितेंद्र चव्हाण, विवेक जोशी, पत्रकार राजेश प्रधान, नरेश पवार, संतोष पाटील, प्रशांत पोतदार, नारायण म्हात्रे, वैभव धुमाळ, ऍड.पाटील कटके, विकी पाटील, आकाश तायडे आदींसह साज मराठी व साई सहारा परिवार उपस्थित होते.सध्या संपूर्ण जगासह भारतातही कोरोनाचे संकट असल्याने यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय सुनील पाटील यांनी घेतला होता. परंतु हॉटेल साई सहाराचे मालक साई सेवक कल्पेश ठाकूर व पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रमे राबवून साध्यापणाने सुनील पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेत कोरोना संकटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टीमरचे वाटप करण्याचा संकल्प घेतला.
यावेळी पेण नगरपालिका सभापती निवृत्ती पाटील यांनी वाढदिवसा निमित्त बोलताना सांगितले की, अनेक नागरिक आपला वाढदिवस साजरा करताना केवळ देखाव्या करिता बॅनरबाजीवर व पार्ट्यांवर हजारो रुपयेे खर्च करतात. परंतु त्याच रक्कमेतून जर गोरगरीब सामान्य गरजवंत नागरिकांना मदत पोहोचवता आली तर हीच खरी समाजसेवा ठरेल. त्या अनुषंगाने कोरोना संकटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टीमरचे वाटप केल्याने हॉटेल साई सहारा परिवार व साज मराठी परिवाराचे आभार मानले.पत्रकार सुनील पाटील यांना विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी व मित्र परिवारांनी प्रत्यक्ष भेटून मोबाईल वरून व सोशल मीडिया द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार सुनील पाटील यांचा आदर्श घेऊन इतरांनीही आपला वाढदिवस वायफळ खर्च न करता सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचे आवाहन देवदूत कल्पेश ठाकूर व पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी केले.







Be First to Comment