वाहनचालकांना अपघाताचा धोका
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
वाकण-आमडोशी मार्गावरील काही महिन्यांपुर्वीच डांबरीकरण केलेला रस्ता वाकण पुलाजवळ असलेल्या पोलिस चौकीच्या काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात खड्डे पडून उखडला आहे. त्यामुळे या ठिकाणी पडलेल्या खड्डयांचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्यामुळे वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
वाकण-आमडोशी मार्गावरील काही महिन्यांपुर्वीच बनविण्यात आलेल्या या नविन रस्त्यावरच वाकण पुलाजवळच मोठ्या प्रमाणात पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्ता पुर्णपणे ऊखडला गेला आहे. हा रस्त्या काही महिन्यांपुर्वीच नव्याने बनविण्यात आला होता. पंरतु ऐन पावसाळ्यातच या ठिकाणी रस्ता ऊखडुन गेल्याने संपुर्ण रस्त्यावर खडी पसरली असुन मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर हा उखडलेला रस्ता दुचाकीस्वारांना दिसून येत नसल्यामुळे अनेक वेळा त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे या ठिकाणी जो रस्ता उखडला गेला आहे व मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले त्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनचालकांतुन होत आहे.






Be First to Comment