सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवाशी अल्का परशुराम पवार यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ७० वर्षाचे होते.
त्यांचे नाव अल्का होते परंतु त्यांना सर्वजन कोलाड परिसरात काकी या नावाने ओळखत होते त्या परोपकारी व प्रेमळ स्वरूपाने सर्वांना परिचित होत्या.त्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या.त्यांच्या अचानक मृत्यूमुळे पवार कुटूंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्याच्या अंत्यविधीसाठी सोशल डिस्टन्समुळे मोजकेच नागरिक उपस्थित होते.परंतु मोबाईल वरुन असंख्य नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्याच्यावर गोवे येथील वैकुंठ धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,मुलगी,सून,पुतणे, नातवंडे,पतवंडे व मोठा पवार परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधी दोन्ही एकाच वेळी सोमवार दि.२४ ऑगस्ट २०२० होणार आहेत.






Be First to Comment