वर्षावास प्रवचन मालिकेनिमित्त केले वाटप
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेनिमित्त कोरोना महामारीच्या काळात वादळग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा )
संस्थापक: डॉ.बाबासाहेबआंबेडकर,
राष्ट्रिय अध्यक्षा:महाउपासिका आद.मिराताई आंबेडकर,
राष्ट्रिय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर,राष्ट्रीय सल्लागार
श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, राज्य कार्यकारणी च्या सहकार्याने सदर कार्यक्रम राबविण्यात आल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांनी यावेळी सांगितले.
कोरोना संकटाबरोबरच जुन २०२० मध्ये झालेल्या निसर्गचक्री वादळात पेण तालुक्यातील अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. शिवाय कोरोनाच्या महामारीत गोरगरीब, कष्टकरी, हातावर पोट असलेले मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशावेळी आयु.चंद्रकांत सोनावणे अध्यक्ष पेण तालुका भारतीय बौद्ध महासभा यांच्या उपस्तीत दि. 16 ऑगस्ट 2020 रोजी मु.रामवाडी शिवाजी नगर , येथे शासन नियमांचे काटेकोर पालन करुन वर्षावास प्रवचन मालिकेच्या निमित्ताने रायगड जिल्हा अंतर्गत महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी कडुन आलेल्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. या प्रसंगी आयु.संरक्षण उपाध्यक्ष भगवान शिंदे,प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष संतोष अडसूळे,महिला उपाध्यक्षा सविताताई सुर्वे,महिला संस्कार सचिव रश्मीताई जाधव,पोलीस पाटील गागोदे निकिताताई सताणे, नरेशजी सताणे सरचिटणीस सचिन कांबळे, प्रचार पर्यटन सचिव हरीचंद्रजी गायकवाड,पत्रकार राजेश कांबळे, संघटक मधूकर गायकवाड,भास्कर कांबळे, माजी श्रामणेर सचिन सोनावणे,माजी श्रामणेर विनोद बनसोडे,आदी भिम अनुयायी, धम्मबांधव
आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.








Be First to Comment