सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
शासनाची 108 रूग्णवाहिका सेवा बेभरोशाची ठरत असताना स्वामिनी महिला प्रतिष्ठाणची मोफत सेवा देणारी रूग्णवाहिका संकटमोचक बनली आहे. खालापूर तालुक्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे.गेले तीन महिने अत्यवस्थ कोरोना बाधित रूग्णाला वेळेवर उपचारासाठी नातेवाईकांची फरफट सुरू आहे.ऑक्सिजनची गरज असलेल्या रूग्णाना वेळेवर रूग्णवाहिका न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे.108 क्रमांकावर रूग्णवाहिकेसाठी संपर्क करून सुद्धा वेळेत रूग्णवाहिका न येणे,ऑक्सिजन सिलेंङर संपल्याची कारण दिली जात होती.हि विदारक परिस्थिती पाहून स्वामिनी प्रतिष्ठानच्या कांचनताई जाधव यानी स्वखर्चाने ऑक्सिजनसह सुसज्ज रूग्णवाहिका सेवा सुरू केली आहे.
खालापूर नगरपंचायत हद्द आणि खोपोली शहरासाठी मोफत सेवा दिली जात आहे.याशिवाय पनवेल,मुंबईसह याठिकाणी अत्यल्प दरात रूग्णवाहिका चोवीस तास सेवा देत आहे.कोरोना महामारीत सेवा देणा-या स्वामिनी प्रतिष्ठाणच्या कांचनताई जाधव यांचे तहसीलदार इरेश चप्पलवार आणि दिलासा फाऊंङेशन खालापूरलकङून गौरव करण्यात आला.
अनेक सामाजिक कार्य स्वामिनी प्रतिष्ठाणकङून केली जातात. कोरोना काळात ऑक्सिजन रूग्णवाहिकेची गरज प्रकर्षाने जाणवल्याने कोव्हीङ रूग्णासाठी सर्व सोयीनी परिपूर्ण रूग्णवाहिका सेवा सुरू केली आहे.
कांचनताई जाधव
-स्वामिनी प्रतिष्ठान






Be First to Comment