सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
पावसाळा सुरू झाल्याबरोबर सुरुवातीला पावसाचे पाणी ठिकठिकाणी साठल्यामुळे नदीप्रवाहातून आलेले मासे मारण्यासाठीची एकच लगबग ग्रामीण भागात दिसून येत होती.तर सध्या श्रावण महिन्यात देखील मासेमारीला सुगीचे दिवस आले असल्याचे पहावयास मिळत आहे.
यंदाच्या मोसमी पावसाने बरोबर १ जूनचा मुहूर्त साधत हळूहळू बरबायला सुरुवात केली. तर पुढे बरेच दिवस उलटून गेले तरी मुसळधार स्वरुपात व माश्यांची वल्गन चढेल अशाप्रकारचा समाधानकारक पाऊस न पडल्याने खवय्यांची मात्र निराशाच झाली होती.तर खवय्ये आपली मासे खाण्याची इच्छा भागविण्यासाठी मिळेल ते डबके, नदी, नाले आशा ठिकाणी मिळतील ते मासे पकडून आपली मनाची इच्छा पुर्ण करीत असल्याचे दिसून येत होते.
सध्या श्रावण महिना सुरू असून कधी धो धो पाऊस तर ऊन-पावसाचा खेळ सुरु आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील युवा वर्गाला मात्र मासेमारीसाठी सुगीचे दिवस आले असल्याचे दिसून येत आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे सध्या काही जण़ाचे कामधंदेही बंद असल्याने एक विरंगुळा तसेच पोटापाण्याची व्यवस्था म्हणून ग्रामीण युवा वर्ग मात्र मासेमारी करताना दिसत आहेत.






Be First to Comment