Press "Enter" to skip to content

बेकायदेशीर बांधकामाबाबत हिरामण गायकवाड यांचे उपोषण यशस्वी !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे #

बेकायदेशीर घटना घडण्याच्या अगोदर किंवा ती पत्राद्वारे कळविल्यावर ते रोखण्याचे काम सरकारी बाबू कधीच करत नाहीत , त्यामुळे सामान्य नागरिक लोकशाहीच्या मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषणाचा मार्ग पत्करतो , म्हणूनच पहिल्यांदा कारवाईही अशा बेजबाबदार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यावर होणे गरजेचे आहे , मात्र अशा कामचुकार अधिकाऱ्यांना ” बळीचे बकरे न करता ” सोडले जाते , त्यामुळे त्यांचे फावले जात असल्याचे व धनदांडगे बेदिक्कत बेकायदेशीर बांधकाम करत असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे .

कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतमध्ये बेकायदेशीर बांधकामाबाबत तेथील सदस्य व आरपीआय कार्यकर्ते हिरामण गायकवाड यांनी सहा महिन्यांपूर्वी किरवली ग्रामसेवक अशोक रवदल तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बालाजी पुरी यांना याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रार पत्र दिले होते , मात्र या गंभीर बाबीकडे समस्त अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते . त्यानंतर चार महिन्याच्या लॉकडाऊन काळात सदरच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्यावर सदस्य हिरामण गायकवाड यांनी पुन्हा पंचायत समितीस पत्रव्यवहार करून कामे थांबवून बेकायदेशीर कामे चौकशी करून तोडावे , अन्यथा १५ ऑगस्ट दिवशी उपोषणास बसू अशा इशाऱ्याचे पत्र दिले होते . मात्र या तेरा दिवसात या अधिका-यांनी कुठलीच चौकशी व कारवाई केली नसल्याने अखेर हिरामण गायकवाड स्वातंत्र्य दिनी कर्जत पंचायत समिती येथे उपोषणास बसले व नंतर सदरच्या गंभीर बाबींची दखल घेऊन गट विकास अधिकारी बालाजी पुरी , सह गट विकास अधिकारी राजपूत , विस्तार अधिकारी सुनील अहिरे ,किरवली ग्रामसेवक अशोक रवदल व इतर अधिकारी वर्गांनी चर्चा करून मध्यस्थी केली व उपोषणकर्ते सदस्य हिरामण गायकवाड यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यांच्या मागण्यांची पूर्तता व कारवाई चार दिवसांत करण्यात येईल , असे लेखी पत्र देण्यात आले .
यावेळी किरवली सदस्य हिरामण गायकवाड यांच्या उपोषणास आरपीआय पक्षाने तसेच इतर अनेकांनी पाठींबा दिला होता . साडेचार वाजता गट विकास अधिकारी बालाजी पुरी यांनी पाणी देऊन उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले . मात्र चार दिवसांत कारवाई न केल्यास पुन्हा बेमुदत उपोषणाला बसू , असा ईशारा नवनिर्वाचित नेरळ ग्रामपंचायत सदस्य , व आरपीआय जिल्हा संपर्कप्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांनी दिला आहे . उपोषण सांगता प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड , आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड , कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड , युवा अध्यक्ष तानाजी गायकवाड , उपाध्यक्ष नरेश गायकवाड , दीपक गायकवाड , उमेश गायकवाड , दीपक जाधव , दीपक भालेराव , सचिन भालेराव , संदीप गायकवाड , प्रवीण गायकवाड , भारत रोकडे , महेंद्र भालेराव यांसह आरपीआयचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते . आत्ता चार दिवसांत कामचुकार अधिकारी बेकायदेशीर कामाबाबत काय कारवाई करतात , यांकडे समस्त कर्जत तालुक्याचे लक्ष लागून आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.