Press "Enter" to skip to content

गोरगरिबांना सेवा देणा-यांना कोरोना योध्दाने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हा अध्यक्ष अतुल चव्हाण यांच्या उपस्थितीत नवीन पनवेल येथील गुरुद्वाराचे माजी अध्यक्ष व संस्थापक सदस्य हरचंद सिंह सग्गु यांनी गुरुद्वाराच्या माध्यमातून गेली चार महिने गोरगरिबांना धान्य व जेवणाचे अविरत सेवा देण्याचे काम केले त्याबद्दल त्यांचा मनसेचे नवीन पनवेल शहर अध्यक्ष पराग बलड यांनी त्यांना कोरोना योद्धा म्हणून शाल व सन्माचिन्ह देऊन सन्मानित केले.

नवीन पनवेल येथील डॉक्टर प्रसन्न चंद्रात्रे यांनी गेल्या चार महिन्यांमध्ये येणाऱ्या पेशंटला योग्य ते सहकार्य केले याबद्दल त्यांनादेखील शाल व सन्मानचिन्ह देऊन कारोना योद्धा म्हणून सन्मानित केले.

नवीन पनवेल येथिल सफाई कर्मचारी याना देखील करोना योद्धा म्हणून शाल व सन्मानचिन्ह देउन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी मनसेचे नवीन पनवेल येथील ॲड.संतोष सरगर;विभागअध्यक्ष रोशन पाटील;विभागअध्यक्ष अनिकेत मोहिते आणि मंदार गोसावी,सौरभ पाटोळे, प्रफुल कांबळे आदी मनसेनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.