प्राध्यापक राजेंद्र मढवी यांनी उरणमध्ये केला मालेगाव पॅटर्न काढा
सिटी बेल लाइव्ह / उरण(वैशाली कडू) ###
कोरोना कोविड १९ याने बाधीत असलेल्या पेशंटवर मालेगावमध्ये आयुर्वेदिक काढ्याचा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी होऊन संपूर्ण मालेगाव कोरोनामुक्त झाले आहे. या काढ्याचा प्रयोग प्राध्यापक राजेंद्र मढवी यांनी उरणमध्ये केला. त्यावेळी कोरोना पेशंटनी काढा घेऊन समाधान व्यक्त केले. त्यामुळे मालेगाव पॅटर्न काढा उरणमध्येही यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
देशात व राज्यात कोरोना कोविड १९ ने हाहाःकार माजवला आहे. त्याने अनेकांचे जीव गेले आहेत. त्यावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेडही खाली नाहीत तसेच मयत झालेल्यांचे विधी सोपस्कार ही रितीरिवाजा प्रमाणे करता येत नाही. एवढी या कोरोना विषाणूंची दहशत माजली आहे. त्यामुळे देशातील जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
माळेगामध्येही कोरोनाने हाहाःकार माजवला होता. परंतु तेथील जाणकारांनी आयुर्वेदिक सामुग्रीच्या साह्याने आयुर्वेदिक काढा बनवून तो काढा कोरोना बाधीत पेशंटला सकाळ संध्याकाळ अशा दोन वेळेस देण्यास सुरुवात झाल्यानंतर कोरोना पेशंट ठणठणीत बरा होत गेला. या काढ्याच्या प्रयोगामुळे संपुर्ण मालेगाव कोरोनामुक्त झाले आहे.
उरणमधील प्राध्यापक राजेंद्र मढवी यांना सदर काढ्याबद्दल आरोग्य प्रतिनिधी श्री. मोहन जगताप यांनी माहीती दिली सदर माहिती ऐकून याबाबत अधिक अभ्यास करून त्याची पूर्ण माहिती घेऊन हा प्रयोग उरणमध्ये करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेऊन त्यांच्या बरोबर या संदर्भात चर्चा केली. त्यांनी संमती दिल्यानंतर केअर पॉईंट व सिडको ट्रेनिंग सेंटर येथे असलेल्या कोरोना कोविड १९ ने बाधीत असलेल्या पेशंटला हा आयुर्वेदिक काढा प्रा. राजेंद्र मढवी सर यांनी तयार केला सदर उपक्रमात संतोष पवार यांनी प्रत्यक्ष साथ दिली. हा काढा घेतल्यानंतर सर्व पेशंटनी समाधान व्यक्त केले. यामुळे सदर मालेगाव पॅटर्नचा काढा उरण कोरोनामुक्त होण्याचा आशेचा किरण दिसू लागला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सदर काढा हा पाणी १ लिटर, दालचिनी २ १/२, काळी मिरी ५, लवंग ३, इलायची २, तुळशीची पाने ४, गवती चहाची पाने ४, गुळ चवीनुसार, आले गुळाच्या खड्याएवढा, हळद १ चमचा आदी सामान घेऊन सर्व वस्तू बारीक करून पाण्यात उकळून घेणे. त्यानंतर चाळणीतून चाळून गरम पाणी सकाळी अनशापोटी व रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. हा काढा घेतल्यामुळे मालेगाव नाशिक येथील सर्व कोरोना बाधीत पेशंट कोरोनामुक्त झाले असून आता एकही पेशंट सापडत नाही. तरी उरणमध्येसुद्धा हा आयुर्वेदिक काढा घेण्यास सुरू करून मालेगावच्या धर्तीवर उरणही कोरोनामुक्त झाले तर पनवेल, नवी मुंबईत सुद्धा मालेगाव पॅटर्न राबविण्यास हरकत नाही असे प्राध्यापक राजेंद्र मढवी यांनी विश्वास व्यक्त केला.
Be First to Comment