सिटी बेल लाइव्ह / धर्माबाद #
येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्याध्यापक एम. एन. कागेरू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मीना रवी वावळे, उपाध्यक्ष लक्ष्मण पांचाळ, सौ. लक्ष्मीबाई आंबेवार, स्वीकृत लोकप्रतिनिधी नगरसेवक रमेश पाटील बाळापूरकर, पत्रकार भगवान कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विषय शिक्षक नासा येवतीकर, सौ. एम. डी. जोशी, सौ. सी. एच सय्यद, ए. एम. सय्यद, श्रीमती एस. टी. बेहरे, एम. एन. हिमगिरे यांच्यासह दोन चार विद्यार्थी उपस्थित होते. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी विद्यार्थ्यांविना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि जल्लोष दिसून आले नाही. सॅनिटायझरचा वापर करणे, तोंडाला मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवून उभे राहणे या कोव्हीड – 19 अंतर्गत मा. जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून ध्वजरोहण करण्यात आले.






Be First to Comment