सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
महा.अंनिस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांचा मानस मैत्र उपक्रमाबाबत स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मोहन भोईर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोविड-19 रूग्ण, त्यांचे नातेवाईक व इतर भयभीत नागरिक यांना मानसमैत्र च्या माध्यमातून मोलाची मदत व मानसिक आधार मिळाला आहे. कोरोना संकटात नागरिकांत भीतीचे वातावरण असते, अशावेळी मोहन भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे काम केले, ही बाब कौतुकाची मानली जात आहे.
मोहन भोईर यांनी कोविड-19 व निसर्ग चक्रिवादळ संकट काळात मानस मैत्र उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मोहन भोईर यांनी हा पुरस्कार मानसमित्र टीम, मानसमित्र कार्यवाह व सर्व मानसमित्र यांना समर्पित केला आहे.







Be First to Comment