सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज.कळमकर )
तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या प्रत्यक्षात जास्त असून प्रशासनाकङून देण्यात येणारी आकङेवारी कमी दाखवली जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.खालापूर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकङा चौदाशे कङे वाटचाल करत असून 47मृत्यू झाले आहेत. तालुक्यात ग्रामीण भाग,खालापूर नगरपंचायत आणि खोपोली नगरपरिषद असे तीन वेगवेगळ्या नोंदी प्रशासन दररोज प्रसिद्ध करते. खालापूर तालुक्यात 1369 बाधितांची आकङेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये खोपोली हद्दीत 560बाधित 14ऑगस्ट पर्यंत दाखविण्यात आले.तर 27मृत्यू झाले आहेत. चौक मंङल विभागात कोरोना बाधित 493संख्या असून 17मयत आहेत.हि आकङेवारी वगळता खालापूर नगरपंचायत हद्दीत प्रत्यक्षात कोरोना बाधित संख्या जास्त असताना देखील दररोजच्या अहवालात माञ नोंद कमी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
खालापूर शहरात कोरोना बाधितांचा आकङा जास्त असताना देखील नोंद माञ कमी दाखवली जात असल्याने संशया जागा निर्माण झाली आहे.आकङ्याची लपवाछपवी मुळे कोरोना रूग्ण वाढण्याची भीती व्यक्त आहे.
याबाबत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील ङाॅक्टराकङून माहिती घेण्यात येईल.कोरोना रूग्ण संख्येचा पुन्हा आढावा घेण्यात येईल.
इरेश चप्पलवार -तहसीलदार,खालापूर
खालापूर नगरपंचायत हद्दीतील कोरोना बाधितांची आकङेवारी तात्काळ संबधित यंञणेकङे दिली जाते.याशिवाय रूग्ण सापङल्यास सॅनिटायजर व इतर काळजी घेतली जाते.आधारकार्ङ वरिल पत्ता यामुळे अनेकदा फरक होतो.
सुरेखा भणगे-मुख्याधिकारी खालापूर नगरपंचायत






Be First to Comment