Press "Enter" to skip to content

व्हॉट्सअपमुळे मिळाले तब्बल तीन लाखांचे हरविलेले मंगळसूत्र

उरण येथील सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा : साडेसहा तोळ्याच सोन्याच मंगळसूत्र महिलेला दिले परत

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)

उरण नगरपालिका सफाई कामगाराने रस्त्याच्या कडेला सापडलेले तब्बल सुमारे तीन लाख रुपयांचे मंगळसूत्र (गंठण) महिलेला परत देऊन प्रामाणिकपणा दाखवला आहे. त्याच्या या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
उरण शहरातील बोरी परिसरात राहणारा सिद्धार्थ कासारे हा नगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ याच्या भावाचे लग्न होते. यावेळी, रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना मुख्य रस्त्याच्या कडेला एक पाकीट पडलेले मिळाले होते. ते पाकीट आपल्या पत्नीचे असल्याचा समज झाल्याने त्याने ते पाकीट घरी नेऊन पत्नीला दाखविले. यावेळी, त्या पाकिटात सुमारे साडेसहा तोळे सोन्याचे गंठण, रोख रक्कम आणि आधारकार्ड असल्याचे दिसून आले. आजच्या लॉक डाऊन काळात ही सिद्धार्थ कासारे याला गरीब असून ही मोह न होता हा दागिना ज्याचा आहे त्याला मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
सिद्धार्थ याने त्वरित आधारकार्डची माहिती व्हाट्सअए ग्रुपवर फॉरवर्ड केल. दरम्यान, पाकीट आणि गंठण हरविलेल्या प्रिती घरत यांचे पती यांना पाकीट मिळाले असल्याचा फोन आला आणि त्यांनी सिद्धार्थ कासारे याचे घर गाठले. यावेळी, सिद्धार्थने महिलेची ओळख पटवून प्रामाणिकपणे सुमारे तीन लाख रुपयांचे गंठण महिलेला परत दिल्याने प्रिती घरत यांना अश्रू अनावर झाले होते.
सफाई कामगार सिद्धार्थ कासारे याच्या प्रामाणिकपणा बद्दल त्याचा उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, नगरसेवक अतुल ठाकूर, कामगार नेते संतोष पवार व गणेश पाटील यांनी सत्कार केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.