आमदार .डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
रोहा तालुक्यातील अल्पवयीन मुलींचा बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या प्रकरणात तपास पूर्ण करून तात्काळ चार्जशीट दखल करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
रोहा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना दि.२६ जुलै, २०२० रोजी समोर आली. त्या दिवसापासून आजपर्यंत शिवसेना प्रवक्त्या तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ.डॉ.नीलम गोऱ्हे ह्या सातत्याने या केसवर लक्ष ठेवून होत्या. कोरोनाच्या परिस्थितीत प्रत्यक्ष भेट देणे शक्य नसल्याने त्यांनी शिवसेना महिला रायगड संपर्क संघटिका व नगरसेविका सौ.सुवर्णा करंजे यांना मुलीच्या कुटुंबाची भेट घेण्याची सूचना केली. त्याप्रमाणे श्रीमती करंजे यांनी पीडित कुटुंबाची नुकतीच भेट घेऊन सांत्वन केले. रोह्यामधील पोलीस स्टेशनला जावून पिडीत मुलीसाठी केसची आताची परिस्थिती जाणून घेण्यासाठी डि.वाय एस्. पी. किरणकुमार सुर्यवंशी यांची भेट घेतली. त्या वेळी तालुका प्रमुख समीर शेडगे ,नगरसेविका समीक्षा बामणे उप तालुका प्रमुख बुवा साळवी, विभाग प्रमुख सचिन फुलारे उपस्थित होते.
यावेळी दूरध्वनीवरून आ.डॉ.गोऱ्हे यांनी मुलीच्या नातेवाईकांशी बोलून त्यांचे सांत्वन केले. ‘मुलीला आम्ही नक्कीच न्याय मिळवून देऊ शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे’. अशा प्रकारे पीडित मुलीच्या कुटुंबाना धीर देण्याचा प्रयत्न आ.डॉ.गोऱ्हे यांनी केला.
यादरम्यान श्रीमती करंजे यांनी अधिकारी यांच्याशी आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे दूरध्वनी वरून बोलणे झाले. यात आ.डॉ.गोऱ्हे यांनी याप्रकरणाचा तपास पूर्ण करून चार्जशीट तात्काळ दाखल करण्याची सूचना प्रशासनास केली. यातील आरोपींना अटक करण्यात आली असून भविष्यात यांना जामीन मिळणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना देखील केली आ. डाॅ. निलम गो-हे यांनी केली आहे.






Be First to Comment