सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १५ जण सापडले आहेत. तर १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह ११६३, उपचार करून बरे झालेले ९०७, उपचार घेणारे २०६, मयत ५० असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज जासई १, ओमकार कॉलनी कुंभारवाडा २, पाणदिवे १, जेएनपीटी २, द्रोणागिरी १, बोकडविरा १, कुंभारवाडा १, नवघर १, रांजणपाडा १, चिरले १, आवरे १, पागोटे १, भेंडखळ १ असे एकूण १५ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. कोप्रोली १, केगाव १, मोरा १, नवापाडा करंजा १, बोरी १, नागाव १, रांजणपाडा १, धुतुम १, वेश्वि १, जसखार २, जांभूळपाडा २ असे एकूण १३ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर आवरे येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
उरण परिसरात कोरोना पॉझिटीव्ह व मयताचा आकडा वाढताना दिसत आहे. तरी जनतेने जागृत राहून कोरोना पासून आपले संरक्षण करण्यासाठी अधिक लक्ष देणे गरजेचे बनले आहे.






Be First to Comment