ध्यान-धारणेत येतोय व्यत्यय, भेट टाळा : भंते वेन सुका यांनी केले जनतेला आवाहन
बौद्ध लेण्यांचा अभ्यास व ध्यान-धारणा करण्यासाठी सुधागड तालुक्यातील नेणवली लेण्यांमध्ये मुक्काम
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
भारतातील महत्वपूर्ण, प्राचीन व ऐतिहासिक बौद्ध लेण्यांना भेट देऊन त्यांचा अभ्यास व ध्यानधारणा करण्यासाठी अमेरिकेतील महिला बौद्ध भंते वेन सुका भारतात आल्या आहेत. सध्या त्या सुधागड तालुक्यातील नेणवली बौद्धलेणी येथे मुक्कामी असून तेथे अभ्यास व ध्यानधारणा करत आहेत. अमेरिकेतील महिला भंते वेन सुका यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे त्यांना ध्यानधारणा व अभ्यासात व्यत्येय येत आहे.
त्यामुळे या ध्यान-धारणेत कोणीही व्यत्यय आणू नका असे भंते वेन सुका यांनी नम्रपणे विनंती करून सांगितले आहे.
अमेरिकेतील भंते वेन सुका यांच्या रायगड जिल्ह्यातील व्यवस्थापनाची जबाबदारी शिक्षक मोरेश्वर कांबळे यांच्याकडे आहे. कांबळे यांनी सर्वांना आवाहन केले आहे की भंते वेन सुका यांना येथे अभ्यास व ध्यानधारणा करायची आहे आणि त्यासाठी त्यांना एकांत हवा आहे. अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी जात आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ध्यानधारणेत व्यत्यय येत आहे. त्यामुळे कोणालाही त्यांच्या बद्दल काही माहिती हवी असेल तर वेन सुका यांना न भेटता मोरेश्वर कांबळे यांना 08149192289 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन केले आहे.







Be First to Comment