सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठणे शहर व विभाग नाभिक समाजाच्या वतीने नाभिक समाजाचे थोर संत श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी प्रमाणेच यावर्षीही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमानुसार नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणातील श्री ज्ञानेश्वर मंदिरात साधेपणाने साजरी करण्यात आली.
श्री संतसेना महाराज यांची पुण्यतिथी नागोठण्यात प्रत्येक वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात येत असते. परंतु यावेळी नाभिक समाज रोहा तालुका अध्यक्ष रविंद्र टके, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब टके, जेष्ठ समाजबांधव बाबाजी मोरे, उदंड रावकर, शहर सलून कमिटी अध्यक्ष सुधाकर निंबाळकर, दिगंबर खराडे, शामकांत नेरपगार, महेंद्र माने, मिलिंद गुजर, राजेंद्र माने, दिपक पवार, अवधूत लिमये, संकल्प महेंद्र माने, सौ. नम्रता महेंद्र माने, सौ. सारिका सुधाकर निंबाळकर, सौ. सुवर्णा बाबाजी मोरे आदींसह समाजबांधव व नागोठण्यातील इतर नागरिकही यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त प्रथम सर्व समाजबांधवांनी श्री संतसेना महाराजांची यथासांग पूजा केल्यानंतर सुधाकर निंबाळकर यांनी पोथी वाचन केले. नंतर आरती व पुष्पवृष्ठी अर्पण करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. दरम्यान श्री संतसेना महाराज पुण्यतिथीमुळे नागोठणे शहरातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्यात आली होती.






Be First to Comment