सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे / नंदकुमार मरवडे #
रोहे तालुक्यातील स्वामीराज व अन्नदा फाऊण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या भारतीय स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून विविध आदी पाडे – वस्ती वरील कुटुंबियांना तयार जीवनावश्यक अन्नधान्य किट चे वितरण करण्यात आले..
सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून,सामाजिक उत्तरदायित्व म्हणून स्वामीराज व अन्नदा फाऊण्डेशनच्या वतीने नेहमीच विविधांगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. त्याच अनुषंगाने सध्या कोरोना या महामारीने सर्वत्र थैमान माजविले असल्याने हातावर कमविणा-यांना जीवन जगताना फारच तारेवरची कसरत करावी लागते. कामधंदा बंद झाल्याने आर्थिक उत्पन्नाचे साधनच नसल्याने ब-याचजणांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.अशा गरजू परिवारांना सामाजिक उत्तरदायित्व,आणि सामाजिक बांधिलकी, एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून दोन्ही फाऊण्डेशनच्या वतीने तयार जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले आहे.
स्वामीराज फाउंडेशन व अन्नदा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळाघर बौद्धवाडी व नीवी आदिवासी,भुवनेश्वर गाव,आरेबुद्रुक आदिवासी वाडी,खातेलीवाडी येथील ठाकूर वाडी ,तारेघर आदिवासी वाडी,बरसोली आदिवासी तसेच निसर्ग चक्रीवादळ बाधित नुकसान ग्रस्त कुटुंबाना आदी विविध दुर्गम विभागा मध्ये सुमारे ४५०/५०० पेक्षा अधिक कुटुंबियांना तयार जीवनावश्यक अन्नधान्य किट चे वितरण करण्यात आले.
जीवनावश्यक अन्नधान्य किट मिळताच गरजू कुटुंबीयांनी स्वामीराज फाउंडेशन व अन्नदा फाउंडेशन चे आभार मानून समाधान व्यक्त करीत त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व च्या उल्लेखनीय कामगिरी ला मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी खारगाव ग्रामपंचायत सरपंच सौ.सलोनी सतेज अपणकर,सतेज अपणकर , माजी ग्रा. पं सदस्य अनिल मातेरे,अवधूत मातेरे, चालक मंगेश शेळके,आरेबुद्रुक ग्रामपंचायत हिरा शीद, उपसरपंच महेश शिंदे,छत्रपती शिवाजी विद्यालय चे स्थानिक अध्यक्ष यशवंत (तात्या साहेब) शिंदे,पत्रकार मित्र,स्वामीराज फाउंडेशनचे अध्यक्ष जयेश माने,उपाध्यक्ष दीपक माळी,खजिनदार मारुती चव्हाण, सह खजिनदार विनायक माने,महेश चव्हाण,सुशील बामणे,हृषीकेश माने,चिंतामणी माने,महेश वाळंज ,महेश माने,शैलेश चव्हाण,विनीत मोरे,रोशन माने,गीतेश नवशे,रामजी माने, स्वप्नील वा ज आदी फाउंडेशन चे सदस्य आदी विविध स्तरातील अन्य प्रतिष्ठित मान्यवर होते.






Be First to Comment