सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (प्रतिनिधी) —
अलीबाग येथील पत्रकार धनंजय कवठेकर यांच्या मातोश्री मंगल अरविंद कवठेकर यांचे रविवारी (दि. 16 आॅगस्ट) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्या 70 वर्षांच्या होत्या.
मंगल कवठेकर या गेल्या काही महिन्यापासून आजारी होत्या. रविवारी (दि. 16 आॅगस्ट) रोजी त्या आपल्या कुरुळ येथील रहात्या घरी असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्व. मंगल कवठेकर यांच्यावर त्याच दिवशी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्रीबाग येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कवठेकर कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक, मित्र वर्ग, पत्रकार, रिक्षा चालक, आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्रकार तथा आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय कवठेकर आणि घनश्याम हे दोन पुत्र, अपर्णा ही मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा दसपिंड विधी 25 आॅगस्ट रोजी तर तेरावा विधी 28 आॅगस्ट होणार असल्याचे कवठेकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले.






Be First to Comment