शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
किशोर धर्मा पाटील यांच्या नेतृत्वाखाली डाँ. हर्षली एकनाथ कडके यांच्या टीमने कोरोनाच्या महासंकटात रोडपालीगाव व परिसरातील नागरिकांना दिलासा देताना विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबीर व औषधे यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोरोनाच्या महामारीत नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. संपूर्ण जनता कोरोनाच्या दहशतीत जीवन जगत आहे. अनेकांचे रोजगार बंद झाले असून उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे निराधार महिला व कामगारांवर उपासी राहण्याची वेळ आली आहे या बिकट परिस्थिती नागरिकांना दिलासा देताना रोडपाली गावच्या डाँ हर्षली एकनाथ कडके यांनी गावच्या प्रती आपली माणूसकी व सामाजिक बांधिलकी जपत मोफत आरोग्य शिबीर व औषधांचे वाटप करण्यात आले शिबिराचे उद्घाटन वसंत शंकर पाटील यांच्या आर्धांगिनी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले यावेळी चंद्रकांत भोईर, रघुनाथ ठाकूर व काशिनाथ पाटील यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते.






Be First to Comment