कोव्हीड योद्धा आणि चक्रीवादळ मध्ये काम करणाऱ्यांचा केला गौरव
सिटी बेल लाइव्ह / कर्जत- (संजय गायकवाड)
कोव्हीड योद्धा आणि चक्रीवादळ मध्ये काम करणाऱ्या कर्जत तालुक्यातील तीन जणांचा व एक सेवाभावी संस्थेचा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सत्कार करण्यात आला.
कर्जत तालुक्यातील कोव्हीड-19 रोखण्यासाठी तसेच 3 जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात उत्कृष्ट काम करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती यांचा योग्य सन्मान करण्यासाठी कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात शिफारस करण्यात आली होती.
कोव्हीड-19 साथरोग उल्लेखनीय काम, कोव्हीड-19 दरम्यान परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी सक्रिय सहभाग,3 जून 2020 रोजी झालेल्या चक्रीवादळात प्रत्यक्ष कामकाज, निसर्ग चक्रीवादळाने बाधित नागरिकांचे पुनर्वसन व मदत यामध्ये उत्कृष्ट काम करणारे तहसील कार्यालयातील लिपिक दीपक राठोड
3 जून 2020 रोजी झालेल्या चक्रीवादळात जिल्हाधिकारी कार्यालय येथील कंट्रोल रूम मध्ये सलग तीन दिवस कामकाज करणारे सेवाभावी रक्षा सामाजिक विकास संस्थेचे अमित गुरव
कोव्हीड-19 साथरोग मध्ये उल्लेखनीय काम,कोव्हीड-19 साथरोग दरम्यान परराज्यातील मजुरांना अन्न वाटप, आदिवासी मजुरांना अन्नधान्य वाटप करणारी कर्जत मधील श्री जैन श्वेतांबर ट्रस्ट कोव्हीड-19 साथरोग मध्ये प्रत्यक्ष कोरोना वार्ड मध्ये काम करीत आहेत तसेच कोरोना ग्रस्त रुग्ण तसेच कोरोना वर मात करणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन, कोरोना साथरोग मध्ये संघ भावनेने मदत काम करत असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सुप्रिया घोसाळकर अश्या तीन व एक सेवाभावी संस्थेचा काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री कु. आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.






Be First to Comment