Press "Enter" to skip to content

गणपती आले तरी वादळग्रस्तांना मदत नाही पोहचली

चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई कधी मिळणार ? नागरिकाचा सवाल !


सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव)

कोरोना टाळेबंदी ने कंबरडे मोडले त्यातच चक्रीवादळाच्या संकटाने पुरे संसार कोलमडले अशा वेळी जगायाचे की मरायाचे हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.

चक्रीवादळ येऊन एक महिना उलटला तरी नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे कोकणात महत्व पूर्ण समजल्या जाणार्‍या गणपती सणात तरी भरपाई रक्कम मिळेल का असा सवाल नागरिक करित आहेत.

नोटबंदी नंतर आलेली प्रचंड मंदी, करांच्या जाचक अटी, वाढलेली प्रचंड बेकारी यामधे मध्यम वर्गिय व सर्व सामन्य नागरिक भरडला आहे. गेली 6 महिने जगावर कोरोना सारखे संकट कोसळले आहे या संसर्ग आजाराने जगाला हरवले आहे. आजारावर लस नाही त्यामुळे रुग्ण वाढत आहेत. चिंता वाढली आहे. किती दिवस घरात बसुन रहायाचे खायचे काय असा विचार हातावर कमवीणार्यांना पडला आहे.

रोहा तालुक्यात चक्रिवादळा ने खुप नुकसान झालें परिस्थिती पूर्व पदावर आणण्याकरिता प्रशासन व सत्तेतील लोकांना यश आले. काहींना भरपाई देखील तातडीने आली खरी परंतू अद्याप असंख्य नागरिक वंचित आहेत. मिळाली ती अशी की ज्यांचे नुकसान कमी त्यांना रक्कम जास्त, नुकसान जास्त रक्कम कमी. एखाद्याचा साधा कौल किंवा पत्रा हलला नाही त्याला 15000 त्यामुळे अधिकारी वर्गाने कुठला निकष लावला ? त्यात खोलवर न गेलेले बरे ! असूद्यात अपत्ती आहे मिळाले त्यांना मिळू द्यात ! काहीचे तर उखळच पांढरे झाले. परंतू खरोखर ज्यांचे नुकसान झाले त्यांना अद्याप रक्कम मिळाली नाही. काही गावांत तर तलाठी व ग्रामसेवका ला हाताशी धरुन या भरपाईत आपल्या लोकांना कशी रक्कम मिळेल असे राजकारण केले गेल्याचा संशय आहे.

यात सुध्दा मताचे राजकरण अशा वृत्तीमुळेचं गावे विकासा पासुन वंचित राहिली आहेत. आता रोह्यात युवा पिढी चे नेतृत्व युवा आमदार करीत आहेत. पाहूया भविष्यात बदल होतोय का ? खासदार, पालकमंत्री, आमदार निधी आणण्यात यशस्वी झाले खरे ! परंतु तो निधी सर्व सामान्यां पर्यंत देण्यात कमी पडले आहेत. आमदार अनिकेत तटकरे यांनी या भरपाई संदर्भात बँकेच्या आडमुठ्या धोरणा बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडली आहे.

कोरोना पासुन ते आज पर्यंत ते जनतेची काळजी घेताना दिसत आहेत. रोह्यात 15 ते 20 वर्ष असाच जनतेच्या कामाचा झपाटा विधान परिषद माझी आमदारांनी घेतला होता. त्यामुळे ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते. आजही त्यांची आठवण निघतेच. आता अनिकेत तटकरे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतात की आणखी कुणाच्या हे माहित नाही. परंतु लोकांना वेळ देऊन जनतेची काम करतात येवढे मात्र निच्छित. त्यामुळे गणपती सणांत तरी चक्रिवादळ ग्रस्तांना भरपाई रक्कम मिळून देऊन अनिकेत तटकरे त्यांचे तारणहार होतील काय ? असा सवाल होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.