Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्य दिनी सेवाभावी संस्थांचा गौरव

कोविड महामारी काळात केलेल्या कार्याबद्दल केले सन्मानित

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल #

कोरोना 19 या विषाणूच्या महामारी मुळे संपूर्ण जगाच्या वागण्या-बोलण्याच्या परिभाषा बदलून टाकल्या.कुणी याला वैद्यकीय क्षेत्राची नफेखोरी म्हणतोय तर कुणी प्रशासकीय यंत्रणेचे अपयश!कुणी याला चीन चे जैविक अस्त्र म्हणतात तर कुणी याला WHO चे षडयंत्र म्हणत आहे.काहीही असले तरी काही सेवाभावी संस्था मात्र निस्वार्थ पणाने अडलेल्या नडलेल्या नागरिकांची सेवा करत होत्या.अशा सेवाभावी संस्थांना कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे निमित्ताने सन्मानित करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने सेवाभावी संस्था आणि कोरोना योद्ध्यांना प्रशस्तीपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले.

संपूर्ण महामारीच्या कालखंडात भुकेल्यांना अन्न देण्याच्या उद्देशाने अन्नछत्र सेवा प्रदान करणारे श्री साई देवस्थान वहाळ तसेच आर्सेनिक अल्बम औषधे,जीवनावश्यक वस्तू यांचे विनामूल्य वाटप करणारी रोटरी क्लब ऑफ उलवे नोड अशा संस्थांना प्रशस्ती पत्रके प्रदान करण्यात आली. जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला देखील यावेळी अतुलनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

जीवनावश्यक वस्तूंच्या सोबत अर्थसहाय्य करणे,अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे साठी बस सेवा पुरवणे,लागण झालेल्या रुग्णांना बेड मिळवून देणे अशा कार्यात ही संस्था अग्रेसर राहिली आहे.गौरव सोहळ्याला उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले,आयुक्त सुधाकर देशमुख, वी. प.नेते प्रितम म्हात्रे,उपमहापौर जगदीश गायकवाड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उपविभागीय कार्यालय, पनवेल यांच्या मार्फत कोरोना महामारी काळात जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था करत असलेल्या समाजउपयोगी कार्याबद्दल कोविड योद्धा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी उपविभागीय अधिकारी, पनवेल तसेच तहसिलदार, पनवेल यांचे आभार मानत आहे व असेच समाजउपयोगी कार्य करत राहू असे आश्वस्त करत आहे.                       
प्रितम म्हात्रे,
विरोधी पक्षनेते- पमपा

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.