सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
महाराष्ट्र राज्यातील सर्व घोषित -अघोषित विना अनुदानित , स्वयंअर्थ सहाय्य तत्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना तात्काळ वेतन देण्यात यावे अशी मागणी जनसेवक प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल द्वारे देण्यात आले आहे.
कोरोना महामारीने थैमान घातले असल्याचे चित्र निर्माण झाले असून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील शाळा,कनिष्ठ महाविद्यालय बंद असून अॉनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना करण्यात आली असून विशेषतः घोषित-अघोषित विना अनुदानित ,स्वयंअर्थ सहाय्य तत्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना अनुदान नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे, तरी राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या व अन्याय ग्रस्त प्राध्यापकांच्या कुटुंबांना योग्य न्याय मिळवून द्यावा ही मागणी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांनी केली आहे.
Be First to Comment