सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे ###
रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीतील कराडे खुर्दं ग्रामपंचायत परीसरात येणाऱ्या रसायनी हाॅटेल (उज्वल हाॅटेल) भोवतालच्या परीसराला पावसाच्या पाण्याने वेढले असून परीसराला तलावाचे स्वरुप आले आहे.यात रसायनी हाॅटेल चार फुट पाण्यात गेल्याने हाॅटेलातील फर्निंचर व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.तर हाॅटेलजवलच विजवितरणाचा ट्रान्सफार्म असलेले पोल पाण्यात बुडाल्याने शिवाय चार ते पाच फुट पाणी साचल्याने ट्रान्सफार्म पाण्याच्या संपर्कात येवून मोठी दुर्घंटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही समस्या सुटावी यासाठी हाॅटेल मॅनेजर विशाखा चितले यांनी कराडे खुर्दं ग्रामपंचायत,बिडीओ, जिल्हाधिकारी,एमआयडीसी आदींना मे २०२० रोजी पत्रव्यवहार केला होता.परंतु सदर प्रश्न मार्गी न लागल्याने पावसाचे पाणी हाॅटेललगतच्या परीसरात साचून तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
रसायनी हाॅटेलनजीकच्या परीसरात विकासकांची वाणिज्य व निवासी संकुलाचे काम सुरू असून पावसाली नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारे नाले याअगोदरबंद केल्याने शिवाय एमआयडीसीचेही पाणी साचत असल्याचे हाॅटेल मॅनेजर विशाखा चितले व प्रकाश यांनी बोलताना सांगितले.
रसायनी हाॅटेलमध्ये पाणी शिरल्याने हाॅटेलचा तलमजला पाण्यात बुडाला आहे.यामुले हाॅटेलातील लाकडी टेबल ,खुर्चीं,किचन साहित्य व इतर जिवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. या लाॅजिंग हाॅटेलातील खोल्याही रिकाम्या झाल्या आहेत.कोरोना पाश्र्वभूमीवर बसलेला फटका आणि पुन्हा नुकसान यामुळे आम्ही उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला.रसायनी हाॅटेल परीसरात गेल्या पाच दिवसांपासून पाण्याची पातळी आहे तशीच राहून सध्या तीन ते चार फुट पाणी आहे.या व्यावसायिकाला हाॅटेल बंद करण्याची पाली आली आहे.तरी संबंधित प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी विशाखा चितले व प्रकाश यांनी केली आहे.
Be First to Comment