सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) ###
कोविड १९ आजाराचे रुग्ण दिवसागणिक वाढतात आहेत त्यातच कोविड १९ च्या उपचाराचे घोषित हॉस्पिटलची मर्यादा आणि तेथील बेड्स ची संख्या अपुरी पडू लागली आहे ,त्यामुळे कोविड संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचारार्थ बेड्स मिळत नसल्याने वैटिंग वेळ रहावे लागत आहे टेस्ट पॉझिटिव्ह येऊनही बेड्स नाल्याने घरी राहून हे रुग्ण घरातील मंडळींच्या संपर्कात येऊन अधिक जणांना बाधित करीत असल्याने पनवेल महापालिकेने महापालिका हद्दीतील ट्रस्ट संचालित रुग्णालये ताब्यात घेऊन तेथे कोविड चे उपचार द्यावेत अशी मागणी नागरिकांना कडून होत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्र मोठे आहे त्यातच पनवेल च्या ग्रामीण भागातील रुग्ण संख्याही वाढताना दिसत आहे यामुळे गेले आठवडाभर कोविड पॉझिटिव्ह रुग्नांना कोविड हॉस्पिटल मध्ये बेड्स उपलब्ध नसल्याने घरीच राहावे लागत आहे ,मात्र या काळात घरातील व्यक्तींच्या संपर्कात आल्याने घरातील सदस्य हि पॉझिटिव्ह येऊन रुग्ण संख्या वाढीचा धोका निर्माण झाला आहे पनवेल महापालिका क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र असा मिळून रोजची कोविड रुग्णांची संख्या दोनशे च्या वर जात आहे त्यातच कोविड चे उपचार करणारे हॉस्पिटल हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत त्यामध्ये इंडिया बुल्स सोमाटणे येथे अलगीकरण केले जाते तर एम जी एम हॉस्पिटल कामोठे , उपजिल्हा रुग्नालय पनवेल ,खारघर येथील दोन ,कळंबोली येथील तीन अशा निवडक रुग्णालयांचा समावेश असल्याने हि हॉस्पिटल अपुरी पडत आहेत त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने तातडीने ट्रस्ट संचालित हॉस्पिटल ताब्यात घ्यावे त्याच प्रमाणे काही खाजगी रुग्णालये कोविड उपचारार्थ होपीटल देऊ करीत असतील तेर त्यांच्याकडून हि घ्यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत अन्यथा काही दिवसांनी रुग्ण उपचाराविना राहतील अशी वेळ येईल असे बोलले जात आहे
Be First to Comment