शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांची मागणी ###
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर)###
महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये कोरोना उपचाराची सुविधा करण्याची मागणी शिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 1000 आजारांवर उपचार केले जातात. कोरोना महामारी रोगाचा सुद्धा या योजनेअंतर्गत अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्यासह आरोग्य विभागाचे सचिव आणि जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांनी पुढाकार घेऊन राज्यातील शंभर टक्के जनतेला आरोग्य हमी दिली आहे. शुभ्र रेशन कार्डधारकांना ही या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अशा प्रकारची सुविधा देणाऱ्या महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य आहे. दरम्यान पनवेल परिसरातील काही रुग्णालये हे जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर आहेत. त्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा करण्यात यावी. अशी न्याय मागणीरामदास शेवाळे यांनी केली आहे. जन आरोग्य योजना कार्यालयातून याबाबत यादी घेऊन तेथे कोविड रुग्णालय सुरू करण्यात यावे. जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना मोफत आणि चांगले उपचार मिळतील. याविषयी महापालिकेने गांभीर्याने विचार करावा पुढील कार्यवाही करावी अशी विनंतीशिवसेना महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी केली आहे.
Be First to Comment