शासकीय नियमांचे पालन करून संविधानिक मार्गाने होणार ग्रामीण रुग्णालय मागणीचे धरणे आंदोलन – हभप महेश पोंगडे महाराज
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)
पालीत ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी सत्यशोधक वारकरी महासंघचे रायगड जिल्हाध्यक्ष हभप महेश पोंगडे महाराज तालुक्यातील जनतेसह आज 15 ऑगस्टला धरणे आंदोलन करणार आहेत. सर्व शासकीय नियमांचे पालन करत संविधानिक मार्गानेच हे धरणे आंदोलन होणार असल्याचे हभप महेश महाराज पोंगडे यांनी सांगितले.
हभप महेश पोंगडे महाराज म्हणाले की सुधागड तालुक्यातील जनता स्वतंत्र दिनी सरकारचे लक्ष ग्रामीण रुग्णालय आणि समस्या कडे वेधण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत कोरोनाशी सरकार आणि प्रशासन निकराची झुंज देत आहेत त्यांना सहकार्य करूनच उद्याचे आंदोलन करायचे आहे . सुधागड मधील अनेक ग्रामपंचायतींनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे .अनेक सामाजिक संघटना यांनी पाठींबा दिला आहे असे पोंगडे महाराज यांनी सांगितले
त्यांनी सर्वांना विनंती की आपण पाठींबा देण्यासाठी येतांना आपल्या गावचे प्रतिनिधी म्हणुन फक्त दोन दोन वेक्ती या. तोंडाला मास्क आणि शारीरिक अंतर ठेवून आंदोलन ठिकाणी थांबायचे आहे. आपला लढा आपल्या संविधानिक हक्कासाठी आहे तो संविधानिक मार्गानेच लढायचे आहे ….
आंदोलन ठिकाणी “पाली ग्रामीण रुग्णालय संघर्ष समिती,, गठीत होणार आहे. असे ह भ प पोंगडे महाराज यांनी सांगितले.
सुधागड तालुक्यात ग्रामीण रुग्णालयासाठी पोंगडे महाराजांनी पुकारलेल्या जनांदोलनाला पाठींबा द्या – कवी उमेश जाधव यांचे कवितेद्वारे आवाहन
सुधागड तालुक्यात पालीमधे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय व्हावं यासाठी सत्यशोधक वारकरी महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश महाराज पोंगडे स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सर्वसामान्य सुधागडकरांच्या भावना कवी उमेश जाधव यांनी एका कवितेमधून मांडल्या आहेत.






Be First to Comment