रोहा तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २११ वर पोहोचली ###
सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) ###
रोहा तालुक्यात कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.आज बुधवार दि.८ जुलै रोजी तालुक्यात ९ नवे रुग्ण आढलून आल्याने तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २११ वर पोहोचली आहे.
आज रोहे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे.तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २११ वर जाऊन पोहोचली आहे.आज नोंद झालेल्या नवीन ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये वेलशेत येथील १कल्पक सोसायटी मधील २,सुरुची हॉटेल १,निरलोन कॉलनी १,शिवाजी वसाहत वरसे १,श्रीकृष्ण नगर भुवनेश्वर १,गांगळवाडा अंधारआळी १ तर तळवली अष्टमी १ असे एकूण ९ रुग्ण आज पोसिटिव सापडले आहेत.
रोहा तालुक्यात कालपर्यंत बाधीतांची संख्या २०२ होती.मात्र आता ९ नव्या रुग्णांची भर पडल्याने कोरोना बाधितांची आता संख्या २११ वर पोहोचली.यामध्ये औषधोपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ९३ असून बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या संख्येत मात्र बर्या पैकी वाढ झाल्याने त्यांची संख्या ११६ आहे.






Be First to Comment