सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर) ###
पोलादपूर नगरपंचायतीच्या पाचव्या नगराध्यक्षपदासाठी राजन पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून छाननी प्रक्रियेत वैध ठरला आहे. त्यामुळे येत्या 13 जुलैरोजी निवडीची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे.
शेवटच्या कालावधीमध्ये आधी नागेश पवार यांना नगराध्यक्ष आणि प्रकाश गायकवाड यांना उपनगराध्यक्ष त्यानंतर राजन ऊर्फ बच्चू पवार यांना नगराध्यक्ष आणि प्रसन्न बुटाला यांना उपनगराध्यक्ष करण्याचा निर्णय शिवसेना पक्षसंघटनेने घेतला. त्यानुसार ज्याप्रमाणे नागेश पवार यांच्या निवडीनंतर सिध्देश शेठ यांचा राजिनामा घेऊन प्रकाश गायकवाड यांची निवड करण्यात आली. त्याप्रमाणेच, उपनगराध्यक्ष प्रकाश गायकवाड यांचा राजिनामा राजन पवार यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर 13 जुलैला घेण्यात येऊन त्याजागी प्रसन्ना बुटाला यांची उपनगराध्यक्ष पदासाठी निवड केली जाणार असल्याचे संघटनेकडून सांगितले जात आहे.
राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहरप्रमुख सुरेश पवार, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, कृउबा संचालक लक्ष्मण मोरे, माजी नगराध्यक्ष निलेश सुतार, गटनेते उमेश पवार, ज्येष्ठ शिवसैनिक मंगेश नगरकर आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मुख्याधिकारी विराज लबडे यांच्याकडे राजन पवार यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल सादर केला आहे. दरम्यान, शिवसेनेमध्ये अनेक अन्य पक्षियांचे आगामी नगरपंचायतीची निवडणूक डोळयासमोर ठेऊन प्रवेश होण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी, ही वाढती अनुकूलता भविष्यात शिवसेनेच्या निष्ठावंतांवर अन्याय करणारी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Be First to Comment