Press "Enter" to skip to content

हालीवली ग्रामस्थांच्या बँक आली दारात

बँक आपल्या दारात : हालीवली सरपंच प्रमिला बोराडे यांचा ग्रामस्थ व शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे #

सध्या कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे धोकादायकच वाटते. त्यातच काही व्यवहार तसेच पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत असल्याने नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जावे लागते. तेथे देखील खुप रांगा लागलेल्या असतात.परंतु आपल्या ग्रामस्थांचा हा त्रास वाचावा म्हणून PM KISAN योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे २०००/-रू.अवघ्या पाच मिनिटांत थेट शेतकऱ्यांच्या हातात गावातच मिळावे तसेच इतर नागरीकांनाही बँकेत न जाता आपल्या खात्यातील पैसे गावातच काढता यावे यासाठी हालिवली ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या प्रयत्नाने व मा.विभाग प्रमुख व तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बोराडे यांच्या सहकार्याने गावातच Doorstep Banking (बँक आपल्या दारात ) हि योजना सुरू करण्यात आली आहे .

यावेळी नवी मुंबई विभागाचे सहाय्यक अधीक्षक विलास कुंभार,इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील पनवेल शाखेचे मँनेजर सुशील अहिरे, किरवली शाखा डाकघर येथील पोस्टमन अतिश बार्शी व पोस्टमास्तर भुषण बडेकर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या उपक्रमामुळे ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले व त्यांना आनंद ही झाला . बँक आपल्या दारात या उपक्रमाचा फायदा पंचक्रोशीतील तसेच हालीवली गावातील नागरिकांना होणार आहे . यामुळे कोरोना संसर्ग होण्यापासून नागरिकांचा बचाव देखील होईल म्हणूनच या स्तुत्य उपक्रमाबाबत हालीवली सरपंच सौ . प्रमिला बोराडे व शिवसेना विभागप्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बोराडे यांचे अनेकांनी आभार मानले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.