सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) ###
कोरोना कोविड १९ च्या संकटाचा सामना करण्याची कठीण वेळ जनतेवर आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ग्रामपंचायत वाईज कमिटी नेमत त्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी दिली आहे. परंतु या कमिटी मधील एखादं दुसरा प्रतिनिधी हजर असतो अन्यथा ज्यांचा यात समावेश नाही असे आशा वर्कर व अंगणवाडी सेविका ही जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना सुरक्षतेसाठी कोणतेच साधन दिलेले नाहीत अल्प वेतनात त्या आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तरी याची दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेऊन त्यांच्या वेतनात वाढ करून त्यांना सुरक्षतेची उपकरणे देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात गावोगावी होत चालला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जनतेच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत निहाय कमिटी स्थापन करून त्यांच्यावर जनतेत जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविली आहे. मात्र यातील काही पदाधिकारी भीतीपोटी न जाता ही जबाबदारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना पार पाडावी लागत आहे.
एखादा पेशंट पॉजेटीव्ह आढळला तर त्या ठिकाणी कमिटीमधील एखादं दुसरा पदाधिकारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना घेऊन पॉजेटीव्ह पेशंटच्या नातेवाईकांना कॉरोटाईन करण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करीत असतात. मात्र या आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना वेतन ही अल्प प्रमाणात आहे. तसेच त्यांच्यासाठी कोणीच सुरक्षतेसाठीची मास्क, सानिटायझर मिळत नाही. त्यांना स्वतःच खरेदी करून आपली सुरक्षा करण्याची वेळ आली आहे. तसेच जे इतरांची जीवावर उदार होऊन सुरक्षा करतात त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणीच विचार करताना दिसत नाहीत. तरी सदर आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या वेतनात वाढ करून त्यांना सुरक्षेसाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकारी चौधरी यांनी पुरविण्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Be First to Comment