सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) ###
देशात व राज्यात कोरोना कोविड १९ ने हाहाःकार माजवला असतानाच उरणमध्ये ही कोरोनाचा फास आवळू लागला आहे. त्यामध्ये आमजनते बरोबर आता कामगार, व्यापारी व शासकीय कर्मचारी वर्ग, पोलीस हे सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकू लागल्याचे शासकीय यंत्रणेच्या सूत्राकडून सांगितले जात आहे. वरिष्ठ अधिकारी वर्गही कोरोना बाधीत होऊनही संबंधित यंत्रणा माहिती लपवून ठेवत असल्याची माहिती कोरोना तपास यंत्रणेने आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव उरणमध्ये वाढत चालला आहे. दररोज पॉजेटीव्हचा आकडा वाढत चालला आहे. त्याच बरोबर पेशंट बरे होत आहेत. परंतु बरे होण्यापेक्षा पॉजेटीव्हीचा आकडा वाढताना दिसत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कोरोना पॉजेटीव्ह आढळू लागले आहेत. मधल्या कालावधीत लॉकडाऊनला काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. आताही सदर लाॅकडाऊन शासकीय आदेश पाळत नसलेल्या व्यापारी व नागरिकांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
या परिसरातील कंपनीत येणारे कामगार वर्ग हे ज्या परिसरात कोरोना प्रादुर्भाव जास्त आहे. त्या परिसरातील कामगार वर्गाच्या सानिध्यात येथील स्थानिक कामगार त्यांचे मित्र-सहकारी आल्याने व अधिकारी वर्गही बाहेरून येत असल्याने त्यांनाही लागण होऊ लागली आहे. मात्र कंपनी प्रशासन सदर माहिती दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण याची माहिती मिळताच कोरोना तपासणी यंत्रणा कंपनीत गेली असता कंपनी प्रशासन माहिती देण्यास टाळाटाळ करत संबंधित अधिकारी वर्ग आले नसल्याचे तसेच ते रजेवर आहेत असेही सांगतात. मात्र तेथील कामगार कर्मचारी मात्र त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगतात. मात्र नक्की काय ते समजत नाही. परंतु कोरोनाची लागण कामगारांना होण्यास सुरुवात झाली आहे. तरी येथील कोणत्याही कंपनीने कोणालाही कोरोनाची लागण झाली असल्यास कंपनी प्रशासनाने कोरोना तपासणी यंत्रणेला कळविल्यास होणारा प्रादुर्भाव नक्कीच कमी होईल असे तपासणी यंत्रणेचे म्हणणे आहे. कारण सदर माहीती लपविल्यामुळे काॅन्टॅक ट्रेसिंगचे काम होऊ शकत नाही.
कोणत्याही कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तरीही कार्यक्रमांना उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. कोरोनाचा प्रादुर्भाव उरणमध्ये सर्वत्र पसरत असताना आता शासकीय यंत्रणा पोलीस ठाणे, पंचायत समिती कर्मचारी, व्यापारी वर्ग, वाहतूक पोलीस, शासकीय अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्ग पॉजेटीव्ह सापडू लागल्याने आकडा वाढल्याने उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत येथील स्थानिक पत्रकारांनी अनेकवेळा शासकीय व कंपनी प्रशासनाला वृत्तपत्रात बातमी देऊन जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. त्याकडे त्यांनी वेळीच लक्ष न दिल्याने उरणमध्ये शहराबरोबर तालुक्यातील गावागावांमध्ये कोरोना हातपाय पसरताना दिसत आहे.
तरी उरणच्या जनतेने घाबरून न जाता कोणाला कोरोनाची लक्षणे आढळत असतील तर त्यांनी ती अंगावर न काढता संबंधित कोरोना तपास यंत्रणेच्या अधिकारी वर्गांना त्वरित कळवून उपचार घेतले तर पेशंट बरे होतात. परंतु घाबरून आजार अंगावर काढल्यास आपला बळी जाऊन घरातील इतरांनाही याची बाधा होऊ शकते यामुळे आमजनतेने जागृत राहून आपली सुरक्षा आपणच करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन कोरोना तपासणी यंत्रणेने केले आहे.
Be First to Comment