नागावमधील प्रत्येक घरी धान्यवाटप : नागाव सरपंच निखिल मयेकर यांचा पुढाकार ###
सिटी बेल लाइव्ह / मुरूड जंजिरा / अमूलकुमार जैन ###
सध्या जगभर कोरोना संसर्गजन्य रोगाचा फैलाव सुरु आहे. हा फैलाव होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली होती.त्याच्यात निसर्ग चक्रीवादळ आल्याने नागरिकांची पुरती वाताहत झाली .त्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले
या काळात अनेक गोरगरीबांचे हाल होत आहेत. अलिबाग परिसरात फार्म हाउस, लॉजिंग, हॉटेल व्यवसायिक असल्याने त्याठिकाणी रोजंदारीवर काम करणारे सर्व सामान्य मोठया संख्येने आहेत. कोरोना संसर्ग रोगाच्या संकट आणि त्यात निसर्ग चक्रीवादळ याने दिलेल्या तडाखामुळे रोजंदारीचे काम बंद ठेवावे लागले आहे. रोजंदारीचे काम करणा-या नागरीकांचे हाल होवू नयेत यासाठी नागाव सरपंच निखिल मयेकर यांनी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची दैनंदिन जीवनाची घडी बसवण्यात एक खारीचा वाटा म्हणून सर्वतोपरी गरजूंना मदत करण्याचा चंग मनाशी बांधला आणि काही सामाजिक संस्था यांना मदतीसाठी आव्हान केले.त्याप्रमाणे स्वतः निखिल नंदकुमार मयेकर(नागाव)यांनी 350 धान्य किट सुरवातीला दिले.त्यानंतर चित्रलेखा नृपाल पाटील(अलिबाग):- 550 धान्य किट
पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर:- 200 धान्य किट
श्रीमंतयोगी प्रतिष्ठान (गिरगाव) :- 20 धान्य किट
मलायका वत्सा (मुंबई ):- 300 धान्य किट
अमित देशमुख (पनवेल) :- 100 धान्य किट
जॅकी सर (लिथा ट्रस्ट) :- 75 धान्य किट
निखिल म्हात्रे(अलिबाग)(दुर्वांकुर युवा मंडळ,मुंबई) :- १० धान्य किट व इतर वस्तूची मदत केली .वाटपाचे काम चक्रीवादळानंतर ६ दिवसांनी सुरू झाले आहे व आजतागायत सुरू आहे
Be First to Comment