गोवे गावांत 4 जण कोरोना पॉजेटिव्ह : परिसरात घबराट तालुक्याची संख्या पोचली १६० वर
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार)
रोहे तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहत असलेल्या सुदर्शन कंपनीच्या हलगर्जीपणा मुले कोरोना रुग्णांत वाढ होत असून,गोवे गावांत एकाच कुटुंबातील ४जण
कोरोना पॉजेटिव्ह आल्याने कोलाड -खांब परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,तालुक्यात आज एकदम ३३तर
एकूण रूग्ण संख्या १६० वर पोचली आहे. दरम्यान कोरोनाच्या महामारित जनता अक्षरशः भरकटली असताना सुदर्शन कंपनीतील रुग्णाच्या आकड्यातही प्रचंड वाढ होताना दिसत आहे.या कंपनी मध्ये काम करणाऱ्या गोवे गावातील तरुणांच्या घरांतील 4 जणांचे रिपोर्ट कोरोना पोजेटीव्ह आल्याने गोवे गावां सह कोलाड खांब परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.रोहा तालुक्यात आजची कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकदम ३३ वर गेली असून पूर्ण तालुक्यातील एकूण संख्या १६० वर पोहोचली आहे. यापैकी ५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून,त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत १०३ रुग्णांवर पुढील औषधोपचार सुरु आहेत. एमआयडीसीतिल सुदर्शन व इतर कंपनीतिल द्रुतगतीने वाढणाऱ्या रुग्णांमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सुदर्शन कंपनीच्या हलगर्जीपणा मुले गावा-गावात कोरोना आजार पोचला असून,त्याच्या कामगारांच्या संपर्कातुन एखाद्या गावांत ईतर व्यक्तीला कोरोना लक्षण आढळली तर त्या बाधित व्यक्तीचा सर्व खर्च कंपनीने करावा अशी मागणी आता गावागावातून होत आहे.
Be First to Comment