सिटी बेल लाइव्ह / उरण / सुभाष कडू #
कोरोना मूळे सर्व काही बंद आसताना कृषी विभाग शेतकर्यांसाठी काम करताना दिसत आहे. गावोगावी ते शेतकर्यांसाठी शेती कार्यशाळा घेत आहेत.त्यांना मार्गदर्शन करत आहेत.शेतीबाबत शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत आहेत व शेती मधील बारकावे शेतकर्यांना शिकवीत आहेत. अशीच एक शेती शाळा कृषी सहाय्यक अधिकारी अदिका पानसरे यांनी उरण मधील पिरकोण येथे साजरा करण्यात आलेल्या कृषी संजीवनी सप्ताहच्या कार्यक्रमात घेतली.पिरकोन मधील गणेश मंदिर येथे घेण्यात आलेल्या सप्ताह सोबतच भात पीक शेती शाळाही घेण्यात आली.त्यावेळी शेतकर्यांना भात पीक लागवडी च्या पद्धतींची माहीती देण्यात आली. त्याचबरोबर नियंत्रित लागवड करुन उत्पन्न कसे वाढवावे.तसेच जमीनीची आरोग्य पत्रिका व खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडल कृषी अधिकारी एन वाय घरत,कृषी सहायक अधिकारी अदिका पानसरे,आर.पी.भजनावळे व एस.एस. ढाकणे उपस्थित होते.






Be First to Comment