पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
सिटी बेल ∆ पनवेल ∆
पत्रकार दिनानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्यावतीने मराठी वृत्तपत्र क्षेत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह देशात दरवर्षी पत्रकार दिन विविध समाजोपयोगी कार्यक्रमे राबवून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने पनवेल तालुका पत्रकार विकास मंच्यच्यावतीनेही विविध उपक्रमे राबवत सामाजिक बांधिलकी जपली जाते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व मंचाचे सल्लागार माधव पाटील, अध्यक्ष विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, हरेश साठे, राजेंद्र पाटील, प्रवीण मोहोकर, नितीन कोळी, यांच्यासह सदस्यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
तसेच नुकताच पत्रकार अनिल कुरघोडे यांच्या मातोश्री सुशीला कुरघोडे, भारत रांजणकर यांच्या मातोश्री गीता गजानन रांजणकर आणि सुधागड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ध. ना. सावरगावकर यांचे निधन झाले आहे त्यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
Be First to Comment