मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्या 34 व्या पुण्यतिथी निमित्त माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान, दादर – मुंबईतील ज्योविस आयुर्वेद, नारी सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. या चिकित्सा शिबिरात 530 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.
मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन श्री धापया देवस्थानच्या सभागृहात करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.
याप्रसंगी ज्योवीस आयुर्वेद हॉस्पिटलच्या डॉ. राज सातपुते, डॉ. ज्योती सातपुते, डॉ. मणिशंकर गुप्ता, आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पहिली महिला वैमानिक क्रीशा जैन,
क्रिकेटपटू सागर सावंत,एव्हरेस्ट वीर संतोष दगडे,
दिगदर्शक प्रदीप गोगटे, चित्रकार हरि फुलावरे, आदर्श शिक्षक प्रताप गीते, पहिली महिला रिक्षा चालक निशा गुप्ता, सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या शिबिरात डॉ. राज सातपुते, डॉ. मणीशंकर गुप्ता यांच्यासह पंधरा डॉक्टर आणि दहा आरोग्यसेवकांनी आरोग्य सेवा दिली. चामखीळ आणि भोवरी हे तत्काळ काढण्यात आले तर पित्त, पाठदुखी, वात, रक्त मोक्षण, आमवात, अग्निकर्म, लकवा आजाराचे रुग्ण यांची चिकित्सा करण्यात आली. बहिरेपणा, सांधे दुखी, कंबर दुखी, गुढघे दुखी आदी व्याधींवर उपचार करण्यात आले. 530 रुग्णांची तपासणी आणि चिकित्सा करण्यात आली. या सर्व रुग्णांना मुंबई येथील नारी सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून सर्व औषधे मोफत देण्यात आली.
यावेळी बोलताना मुकेश सुर्वे यांनी, ‘आम्ही कर्जत तालुक्यासह अन्य ठिकाणी मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरे आयोजित करून ‘आरोग्य आपल्या दारी’ ही संकल्पना घेऊन काम करीत आहोत. तसेच आयुर्वेदाचा खेडोपाडी प्रसार व प्रचार करण्याचा आमचा प्रयत्न असून आत्तापर्यंत पाच हजार रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांना मोफत औषधे देण्यात आली.’ असे स्पष्ट केले. डॉ. राज सातपुते यांनी, ‘कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागाबरोबरच शहरातही आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरांना प्रतिसाद मिळत असून आयुर्वेदाची खरी ओळख होत आहे. आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प केला आहे आणि तो प्रत्यक्षात उतरत असताना मनस्वी आनंद होत आहे.’ असे सांगितले. राजिपचे माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील यांनी, ‘माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्याबरोबर आम्ही काम केले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत फार वेगळी होती. त्यांच्या कार्यकाळात मतदार संघात खूप कामे झाली आहेत.’ असे सांगितले.
याप्रसंगी सोपान गोरे, बिनीता घुमरे, अस्मिता सावंत, आयेशा वाडकर, महेश क्षीरसागर, वसंत ठाकूर, विजय सातपुते, किरण पाटील, सोमनाथ ठोंबरे, ज्योती पाटील, वैशाली ठाकरे, लीना गावडे, , विजया पाटील, यश सुर्वे, आदी उपस्थित होते.
Be First to Comment