सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तीन दिवसांचे लोकमान्य टिळक चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. आज दुसऱ्या दिवशी विविध संघटनांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आमदार महेंद्र थोरवे यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवीला आणि उद्याच आम्ही चाळीस आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
लोकमान्य टिळक चौकात सुरू असलेल्या उपोषणाला कर्जत व्यापारी फेडरेशन, कर्जत मराठी वकील संघटना, कर्जत मराठी शिक्षक संघटना आशा विविध संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी शिक्षक संघटनेचे आशिष उंबरे यांनी आत्तापर्यंत मिळत असलेल्या आरक्षणाची अगदी आकडेवारी पुराव्यासह सादर केली व ओबीसींना देण्यात येत असलेले आरक्षण लोकसंख्येच्या दृष्टीने चुकीचे आहे. त्यामध्ये गल्लत आहे. असे सांगून मराठा म्हणजेच कुणबी असे स्पष्ट केले. यावेळी ऍड. प्रमोद सुर्वे, ऍड. संकेत भासे, ऍड. लता ढाकवळ, ऍड. महेश घारे आदींनी आम्ही शिक्षण घेत असताना आरक्षण नव्हते म्हणून आम्हाला आमच्या इच्छा मोडून अन्य क्षेत्रात शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे आमचे जीवनच बदलून गेले.’ असे स्पष्ट केले. जेष्ठ वकील राजेंद्र निगुडकर यांनी, ‘कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सर्व वकील मोफत काम करू.’ असे सांगितले.
उपोषणकर्त्यांन आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट दिली. यावेळी संतोष भोईर त्यांच्या समवेत होते. आमदार थोरवे आमचा या साखळी उपोषणाला पाठिंबा आहे. आम्ही चाळीस आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आरक्षणाबद्दल काही सकारात्मक मार्ग निघावा म्हणून आग्रह धरणार आहोत.’ असे स्पष्ट केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपचे दीपक बेहेरे, सुनील गोगटे यांच्यासह राजेश लाड, मधुकर घारे, रत्नाकर बडेकर, ज्ञानेश्वर भालिवडे, किसन शिंदे, प्रथमेश मोरे, अंकुश दाभणे, प्रकाश पालकर, शिवाजी भासे, भानुदास पालकर, अनिल भोसले, शरद बडेकर, प्रमोद खडे, अशोक आसवले, सोमनाथ पालकर, काशीनाथ शिंदे, प्रमोद खडे, पूजा सुर्वे, सुमित बैलमारे, प्रदीप सुर्वे, समीर लाड, भगवान घरत, सयाजी गायकवाड, जगदीश दगडे, अरुण देशमुख, रमेश कदम आदी उपस्थित होते.
Be First to Comment