रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
रिलायन्स गॅस पाईपलाईन मुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मोबदला मिळवा यासाठी उपोषण सुरु केले होते. तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा कर्जत तालुका प्रशासनाचे वतीने रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत उपोषणस्थगित करण्याची सूचना केली. उपोषणकर्त्ययांच्या मागण्यांवर एक नोव्हेंबर रोजी कर्जत तहसील कार्यलयात बैठक होणार असून त्यावेळी उपोषण कर्त्यांच्या सर्व मागण्यावर सकारात्मक चर्चा केली जाईल. असे आश्वासन कर्जत तहसील कार्यालयाने उपोषणकर्त्यांना दिले आहे.
रिलायन्स इथेन गँस पाइपलाईन प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे 26 आँक्टोबर रोजी सुरू केलेले आमरण उपोषण 28 आँक्टोबर 2023 पर्यंत उपोषण सुरु होते. प्रकल्प शेतकरी केशव तरे आणि प्रल्हाद तरे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. गेल्या पाच वर्षापासून कर्जत तालुक्यातील निकोप, अवसरे, बिरदोले, कोदिवले, दहिवली, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापुर, गणेगाव, कडाव, मार्केवाडी, सालवड कर्जत येथील रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी प्रातिनिधित्व करणारे केशव तरे यांच्यासह उमेश राणे हे शेतकरी हे 26 आँक्टोबर 2023 रोजी कर्जत तलहिस कार्यालहाबाहेर आपल्या प्रलंबित बसले होते. अपूर्ण मोबदला, खोटे पंचनामे, अर्धवट मोबदला तसेच शेतक-यांना दिलेले आश्वासन पुर्ण करावे या मागणीसाठी हे उपोषण सुरूर होते.
28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा तहसिल कार्यालयाच्या वतीने उपोषण कर्त्यांना विनंती करण्यात आली.त्यावेळी रिलायन्स गॅस पाईप लाईन प्रशासन आणि तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदर सचिन राऊत यांनी यशस्वी मध्यस्थी करीत उपोषण स्थगित करण्यात महत्वाची भूमिका घेतली. यावेळी सर्व उपोषण कर्ते आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, भाजप तालुका अध्यक्ष भगत हे देखील उपस्थित होते. याप्रसंगी शेतक-यांच्या विविध मागण्यांबाबत मार्ग काढण्यासाठी रिलायन्स प्रशासन, सक्षम प्राधिकारी आणि शेतकरी यांची बैठक कर्जत तहसिल कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लावण्याचे लेखी पत्र कर्जतचे नायब तहसिलदार सचिन राऊत तसेच रिलायन्स प्रशासनाचे के नवीन आणि मोहंती यांनी दिले. आणि उपोषण स्थगित करण्याच्या विनंतीवरून हे उपोषण स्थगित केले. येत्या 1 नोव्हेंबर 2023 रोजी दु. अडीच वाजता कर्जत तहसिल येथे प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीत निर्णय झाला नाही तर मात्र पुन्हा एकदा आंदोलन केले जाईल. शेतक-यांचे प्रदिर्घ मागण्यांचा सकारात्मक विचार करून हा शेतक-यांचा प्रलिंबित विषयी मार्गी लावावा. गेल्या पाच वर्षापासून विविध मार्गाने शेतक-यांचा हा लढा सुरू आहे आता शासनाने शेतक-यांचा अंत पाहू नये. अशी भूमिका केशव तरे यांनी यावेळी जाहीर केली.
Be First to Comment