सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत तालुक्यातील जांबरुंग परिसरातील कामतपाडा येथील मैत्रिबोध परिवाराच्या वतीने नवरात्रोत्सव अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला. त्याची सांगता शोभयात्रेने करण्यात आली. आज विजयादशमीच्या दिवशी जांबरुंग परिसरातील असंख्य आदिवासी महिलांसह ग्रामस्थ या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. कर्जतच्या इतिहासातील ही अभूतपूर्व शोभायात्रा ठरली.
43 गावातील महिला ग्रामस्थांसह पारंपरिक ढोल, ताशा सह भव्य शोभायात्रेला सकाळी अकराच्या सुमारास कर्जत शहरात सुरुवात झाली. यामध्ये ठोंबरे वाडी, सराई वाडी, आंबिवली, चौधर वाडी, ताड वाडी, बोर वाडी, खरबाची वाडी, धोत्रे वाडी, खानंद, मोग्रज, टेंभरे वाडी, मेचकर वाडी, सोलन पाडा, भक्ताची वाडी, शिलार वाडी, भल्याची वाडी, मालेगाव वाडी, आनंद वाडी, लोभे वाडी, हिऱ्याची वाडी, रजपे, पाच खडक वाडी, जामरुख, कामत पाडा आदी गावांतील ग्रामस्थांचा सहभाग होता.
श्रीराम पुलापासून निघालेली ही शोभायात्रा आमराई मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मरकावरून टिळक चौक मार्गे श्री मारुती मंदिर नंतर नगरपरिषद मार्गे अभिनव ज्ञान मंदिर मार्गे वाजत गाजत, लेझीमच्या तालावर, पारंपरिक नृत्य व गाणी गात श्रीराम पुलावर आणण्यात होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही शोभायात्रा सुरू होती. सुमारे एक किलोमीटर लांब असलेली ही शोभायात्रा कर्जतच्या इतिहासात अभूतपूर्व ठरली.
Be First to Comment