Press "Enter" to skip to content

अजून एका कोरोना योद्ध्याने गमविले आपले प्राण

सिटी बेल लाईव्ह/अजय शिवकर /केळवणे पनवेल #

आज जागतिक स्तरावर विनाशकारी प्रभाव आणणाऱ्या व महामारी म्हणून साथीचा रोग , म्हणाला जाणाऱ्या कोवीड १९ ने गेल्या तीन -चार महिन्यापासून सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अशा या कोरोनाच्या संकटात पोलिस ,डाॕक्टर,पत्रकार ,सफाईकर्मचारी व तसेच इतर समाजसेवी कार्यकर्ते यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून अगदी देवदूत बनून जनतेची प्रामाणिक व निस्वार्थपणे सेवा केली ,त्यातील कित्येक लोकांच्या जीवावर बेतलं तर काहींना आपला जीव गमवावा लागला, त्यापैकी एक केळवणे गावातील अंगणवाडी सेविका सौ. नंदाबाई हरिश्चंद्र ठाकुर यांना आपले प्राण गमवावे लागले.
नंदाबाई ठाकुर केळवणे गावातील १९८५ साली रुजू झालेल्या पहिल्या आंगणवाडी सेविका, १९७५ ला अकरावी उतीर्ण झालेली ठाकुर परीवारातील पहिलीच महिला असून त्यांना अनेक क्षेत्रात वाव होता परंतु अंगात जनसेवेचे वेड असल्यामुळे त्यांनी गावात आपल्या प्रयत्नाने १९८५ ला पहिली अंगणवाडी चालू करून सामाजिक कार्याला सुरूवात केली .
आतापर्यत त्यांच्या शासकीय कार्यरत सेवेला ३५ वर्षे झाली आहेत ,त्याचा प्रत्येक शासकीय कार्याला सहभाग असतो तसेच सगळ्यांशी चांगली वागणूक व योग्य मार्गदर्शन करायच्या असे त्यांच्या बद्दल नवीन सेविकांचे मत आहे , त्यांनी गावात बचत गटाचीही स्थापना केली आहे .
वयाचे ६५ वर्ष होऊन सुद्धा या कोरोना काळात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे लोकांच्या सेवेसाठी फिरत होत्या , पण कोरोनाने जनतेच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या या कोरोना योद्ध्येचा शेवटी बळी घेतलाच ,१जुलैला त्यांची प्रकृती खालावली म्हणून शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथेच त्यांना मृत्यू आला .
त्यांच्या पाठीमागे २ मुले १मुलगी व पती असा परिवार आहे.
समाजासाठी कार्यासाठी अविरत झटणाऱ्या या कोरोना योद्ध्येला सलाम !
म्हणूनच आशा आहे शासनाने त्यांच्या कार्याची दखल घ्यावी .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.