कर्जत येथे टिळक चौकात उद्या साखळी उपोषण
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
बहुचर्चित मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनला पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. कर्जत तालुक्यातील मराठा समाज शनिवार 28 ऑक्टोबर रोजी टिळक चौकात साखळी उपोषणाला बसणार आहेत. असे बैठकीत जाहीर करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत मागितली होती. ही मुदत संपल्याने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा जरांगे – पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा आंदोलन सुरु केलं.त्यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्यावर मराठा समाज आक्रमक झाला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने रॉयल गार्डन हॉटेलच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी विविध राजकीय पक्षातील नेते व कार्यकर्ते मराठा समाज म्हणून एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावेळी प्रत्येकाने आपली मते मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर होते परंतु त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर ब्र पण काढला नाही त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मराठा समाजा बाबत काय विचार धारा आहे. हे ही स्पष्ट होत आहे. असेही निदर्शनास आणून दिले.
या बैठकीवेळी शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस साखळी उपोषण कर्जतच्या टिळक चौकात शनिवार 28 ऑक्टोबर सकाळ पासून सुरु करण्यात येणार असून पुढील दिशा ठरेल त्यानुसार त्यात बदल ही करता येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी तालुक्यातील असंख्य मराठा युवक उपस्थित होते.
Be First to Comment