Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने जाहीर केली नोटीस

30 ऑक्टोबर रोजी पनवेलमध्ये १२ तासाचा पाण्याचा शट डाऊन

सिटी बेल ∆ पनवेल ∆

गेले काही दिवस ONGC गेट येथे एम.जी.पी.ची लाईन लिकेज असल्यामुळे पाणी साचत आहे त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे त्यासोबतच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाल्याने वाहतुकीची कोंडी सुद्धा सतत होत आहे. या समस्ये बद्दल परिसरातील रहिवासी आणि प्रवास करणारे रहिवासी त्रस्त झाले होते. सदर रस्त्यावरून जाताना दुचाकी वाहनांना खूप त्रास सहन करावा लागत होता.12 ऑक्टोबर पासून सदर ठिकाणी पाणी लिकेज होत आहे अशा प्रकारची माहिती तेथील नागरिकांकडून मिळाली. पण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर कोणतेही राजकीय पुढारी पुढाकार घेत नव्हते.

यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून माहिती घेतली आणि या संदर्भात लवकरच उपायोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून एक नोटीस जाहीर करण्यात आली यामध्ये न्हावा शेवा उपप्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा 1 तालुका पनवेल येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9:00 ते 30 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9:00 वाजेपर्यंत नियोजित शट डाऊन घेण्यात येणार आहे.

यामध्ये कोळखे ONGC गेट जवळ गळती दुरुस्ती करणे, वडघर सत्यम बिल्डिंग नाल्यात 18 मीटर पाईप बदलणे, समता नगर ,पोदी गाढी नदीत लहान मध्यम स्वरूपाच्या गळत्या दुरुस्ती करणे अशी कामे होणार आहेत अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून O.N.G.C. गेट येथे MGP ची पाईपलाईन लिकेज आहे. संबंधित विभागातील अधिकारी श्री.के.बी.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सदरची लाईन ही 40 वर्ष जुनी आहे. ती नव्याने बसवण्याचे 36 की.मी. पैकी 7.5 कि.मी. चे काम पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 8 टीम कार्यरत आहेत अशी माहिती मिळाली. सध्याच्या समस्येवर निवारण करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चेदरम्यान 30 ऑक्टोंबर रोजी M.J.P. च्या माध्यमातून सकाळी 9:00 ते रात्री 9:00 असा 12 तासाचा शट डाऊन घेऊन O.N.G.C. गेट येथील गळती दुरुस्ती सोबतच इतर काही ठिकाणी सुद्धा काम करू असे त्यांनी आम्हाला सांगितले.
:- प्रितम जनार्दन म्हात्रे
मा.विरोधी पक्षनेता
पनवेल महानगरपालिका

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.