Press "Enter" to skip to content

दसऱ्याचे निमित्त

कर्जतकरांनी केली जीवनवाहिनी लोकल गाडीची मनोभावे पूजा

सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆

दररोज इच्छित स्थळी वेळेवर व न चुकता पोहोचविणाऱ्या प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल गाड्यांची पूजा गेल्या अनेक वर्षांपासून कर्जतकर दसऱ्याच्या निमित्ताने करतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी करतात. हल्लीच्या संगणकीय युगातही या पूजेचा खंड पडला नव्हता मात्र कोरोना संकटात दोन वर्षे जीवनवाहिनीची पूजा करता आली नाही. जीवन वाहिनीच्या पूजेची परंपरा अजूनही सुरु आहे. काही प्रवासी निवृत्त झाले तरीही ते जीवनवाहिनीच्या पूजेसाठी आवर्जून उपस्थित असतात. कर्जतहून सुटणाऱ्या बहुतांश लोकल गाड्यांची पूजा त्या -.त्या गाडीने जाणाऱ्या प्रवाशांनी अगदी मनोभावे करून आपल्या जीवनवाहिनी बद्दल आदर व्यक्त केला.

पहाटे चार नंतर सुटणाऱ्या लोकल गाड्यांमधून चाकरमानी व व्यावसायिक दररोज प्रवास करतात. मुंबई ला जाण्यासाठी सर्वात वेळेवर, सर्वात स्वस्त व सुरक्षित प्रवास म्हणजे रेल्वेचा त्यातच लोकल गाड्यांनी हजारो प्रवाशी जा – ये करीत असतात. याची उतराई म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी हे प्रवासी आपल्या जीवनवाहिनीची न चुकता मनोभावे पूजा करतात.

या सर्व लोकल गाड्यांच्या प्रवाश्यांपैकी सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी कर्जत हून सुटणाऱ्या लोकलचे प्रवासी फारच हौसी त्यांनी आपापले डबे सजविलेच शिवाय लोकलच्या पहिल्या डब्याचा पुढचा भागही सजविला होता. या लोकलचे मोटरमन अनिल कानोरिया आणि गार्ड सत बदन बी यांचा सत्कार असिफ मिर्झा यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी कैलास कांबरे, राजस करंजकर आदी उपस्थित होते. यागाडीने बदलापूरहून पहिल्या वर्गाच्या डब्यातून नेहमी प्रवास करणारे अभिनय चव्हाण, हर्षल पोतदार हे त्याचं गाडीत बसून कर्जत पर्यंत डबा सजवित आले आणि नंतर मुंबईकडे मार्गस्थ झाले. सर्व डबे त्या – त्या प्रवाशांनी सजविले होते.

याप्रसंगी अक्षय फाले,मनोज बागले, स्वरूप भाटवाडेकर, विनोद सुरडकर, दीपक बोराडे, सतीश गायकवाड, समीक्षा भोईर, संजीव पराशर, कमलाकर डायरे, आदित्य जोशी, मितेश हाबळे, प्रलाद पावशे, महेश देवघरे, संदीप दिघे, राजेश मते, अनुप दुबे, अनिकेत मराडे, प्रकाश मराडे, भूषण मराडे, विनीत आंग्रे, शिवाजी धुळे, योगेश कर्णिक, प्रवीण मराडे, भगवान मराडे, सदानंद मराडे आदींसह दररोज प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.