Press "Enter" to skip to content

५५ गावामध्ये विविध उपक्रम

दीपक फर्टीलाझर्स व ईशान्य फाउंडेशन मार्फत २० अंगणवाडींना कपाट व वजन काटे तसेच १२ शेतकऱ्यांना जल उपसा साहित्याचे वाटप

सिटी बेल ∆ पनवेल ∆

दीपक फर्टिलायझर्स यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशन मार्फत जवळपास ५५ गावामध्ये विविध उपक्रम राबवले जात असून यामध्ये प्रामुख्याने उपजीविका विकास, आरोग्य, शिक्षण व सामाजिकविकास इत्यादी घटकांवर काम केले जात आहे. आरोग्य उपक्रमांतर्गत दिनांक १३ ऑक्टोबर 2023 रोजी नुकतेच पाले खुर्द येथे २० अंगणवाडींना कपाट व वजन काटे वाटप करण्यात आले. सदर साहित्य श्री अरविंद रामरामे (सा. आयुक्त ICDS नवी मुंबई, श्री दिनेशप्रताप सिंग (कार्यकारी उपप्रमुख दीपक फर्टिलायझर्स), श्री प्रमोद जगताप (सहयोगी संचालक-ईशान्य फाउंडेशन) व श्रीमती सुहिता ओव्हाळ (CDPO, ICDS) यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. श्री प्रमोद जगताप यांनी दीपक फटीलायझर्स यांच्या आर्थिक साह्याने व ईशान्य फाउंडेशन मार्फत सुरु असलेल्या विविध समाजउपयोगी विकास कामाबद्दल माहिती दिली व श्री अरविंद रामरामे यांनी ICDS विभागाकडून दीपक फर्टीलाझर ईशान्य फाउंडेशनने केलेल्या मदतीबद्दल व राबवत असलेल्या विविध विकास कामाबद्दल आभार मानले.

तसेच या कार्यक्रम प्रसंगी तळोजा विभातील विविध गावांतील भाजीपाला पिकवण्याऱ्या १२ शेतकऱ्यांना डिझेल इंजिन, विधुत मोटार पंप, पाईप इत्यादी जल उपसा साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमचे सूत्र संचालन श्री संदिप आर काकडे (सहाय्यक महाव्यवस्थापक-दीपक फर्टिलायझर्स) यांनी केले व श्री योगेश पाटील (प्रकल्प समन्वयक-ईशान्य फाउंडेशन) यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.