कर्जत पंचायत समितीकडून अमृत कलश यात्रा मिरवणूक
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत पंचायत समिती आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यांच्या माध्यमातून सर्व गावांमधून आण्यात आलेल्या मातीचे कलशांना एकत्रित करून अमृत कलश बनविण्यात आला. या अमृत कलशाची यात्रा मिरवणूक कर्जत तालुक्यात काढण्यात आली. तालुक्यातील ग्रामस्थ आणि शासकीय अधिकाऱ्यांचा या अमृत कलश यात्रेत सहभाग होता. यानिमित्ताने मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमात सहभाग नोंदवला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांतर्गत “माझी माती माझा देश” या उपक्रमामध्ये पंचायत समिती कर्जत येथे अमृत कलश यात्रेचे आयोजन केले. कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीं मधून संकलन केलेल्या मातीचे कलश कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती कर्जतच्या आवारात गोळा करण्यात आलेले मातीचे कलश व तालुका स्तरावरील कलश अमृत रथामध्ये ठेवण्यात आले. तालुकास्तरीय अमृत कलशाची वाद्यवृंदासमवेत जयघोषात मिरवणूक काढण्यात आली.
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुहास गरड यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून अमृत कलश यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी कर्जत पंचायत समिती चे प्रशासक आणि गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे तसेच कर्जत पंचायत समितीचे माजी उप सभापती मनोहर थोरवे, सुषमा ठाकरे, वरई ग्रामपंचायत प्रभारी सरपंच संतोष भासे, रजपे ग्रामपंचायत सरपंच दीपाली पिंगळे, नेरळ ग्रामपंचातात सरपंच उषा पारधी, कर्जत नागरपरिषद नगरसेवक संकेत भासे, युवक कार्यकर्ते प्रसाद थोरवे, यांच्यासह कर्जत पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक, सर्व विस्तार अधिकारी, खाते प्रमुख या कलश यात्रेत सहभागी झाले होते.
Be First to Comment