कर्जत शहरात अधिकृत नवीन रिक्षा स्टॅड वाढविणेची मागणी
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून कर्जत शहरात वाढती लोकसंख्या व रिक्षाचा विचार करता अधिकृत नवीन रिक्षा स्टॅड वाढविणेची मागणी करण्यात आली आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी तीन आसनी रिक्षासाठी अधिकृत स्टॅड नाहीत. त्यामुळे रिक्षा रस्त्यामध्ये उभ्या राहतात आहेत. रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या रिक्षामुळे रस्त्यावरून येणा-या, जाणा-या नागरीकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे रिक्षा चालकांना सुद्धा व्यवस्थित धंदा करता येत नाही. या बाबत आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून कर्जत नगर परीषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गारवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कर्जत शहराची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. तसेच रिक्षांची सुद्धा संख्या वाढत आहे. परंतु प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे खुप मोठी वाहतुकीची समस्या कर्जत शहरात तयार झाली आहे. त्यामुळे कर्जत नगरपरिषदेने याची दखल घेऊन कर्जत शहरात ज्या-ज्या ठीकाणी शक्य होईल. अशा ठिकाणी नवीन अधिकृत रिक्षा स्टॅड तयार करावेत. जेणे करून कर्जत शहरातील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल. नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. अशी मागणी आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सदर मागणीवर चर्चा करताना मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात, लवकर पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्ग काढु असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळेस निवेदन देताना आधार असंघटीत जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष वकील कैलास मोरे, सचिव विद्यानंद ओव्हाळ तसेच रिक्षा चालक उपस्थित होते.
रिक्षा चालकांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी कर्जतमध्ये आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून संघटनात्मक कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. त्याच बरोबर असंघटीत कामगारांसाठी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन युनियनचे अध्यक्ष वकील कैलास मोरे हे करत आहेत. त्यासाठी कर्जत मधील असंघटीत कामगारांनी त्याचा लाभ घ्यावा असे देखिल अवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९२७३७०७४७० असा आहे.








Be First to Comment