Press "Enter" to skip to content

एसीपी च्या पत्नीची 31 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सेवानिवृत्त हवालदारासह पत्नीवर गुन्हा दाखल

सिटी बेल ∆ पनवेल ∆

सरकारी निविदेच्या कथित बनावट इलेक्ट्रिकल कामात 50% भागीदारी करून GRP ACP च्या पत्नीची 31.3 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस हवालदार आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन पनवेल येथील रहिवासी पूजा देविदास सोनवणे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, सेवानिवृत्त हवालदार रमेश जाधव यांनी 2019 मध्ये त्यांना सांगितले की, दोन त्यांची पत्नी पुष्पलता ही सरकारमान्य कंत्राटदार होती आणि त्यांच्या दोन कथित नोंदणीकृत कंपन्यांपैकी एका कंपनीला सहा निविदा देण्यात आल्या होत्या. अंबरनाथ, कळवा, पुणे आणि पालघरमधील प्रकल्पांसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडकडून रु. 2.2 कोटीच्या निवीदा देण्यात आल्या असल्याचे सांगितले.

या दाम्पत्याने सोनवणे यांना अर्धी भागीदारी आणि 30 टक्के व्याज देण्याचे आश्वासन देऊन 43.3 लाख रुपये गुंतवण्याचे आमिष दाखविले. नंतर सोनवणे यांना वर्क ऑर्डर दाखवून कामाच्या ठिकाणी नेण्यास सांगितले असता त्यांनी तिला टाळण्यास सुरुवात केली. प्रकल्पाच्या नफ्यातून हा तिचा वाटा असल्याचा दावा करून त्यांनी तिला २५ लाख रुपये दिले, परंतु पुढील देयके थांबवली. विचारपूस केल्यावर, जाधव यांनी तिला सांगितले की, वनविभागाने मॅनग्रोव्ह संरक्षण कंपाऊंड भिंतीचे बिल मंजूर न केल्यामुळे त्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत आणि त्यानंतर ते संपर्कात नाही.

अखेर सोनवणे यांनी बुधवारी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या दाम्पत्याने आणखी अनेक जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.