प्रभुदास भोईर यांच्या दोन सुपुत्रांचा जन्मदिन दणक्यात संपन्न
सिटी बेल ∆ पनवेल ∆
सर्व गुणांचा अधिपती आणि बुद्धीचा दाता असणाऱ्या गणपती बाप्पा वरती अपार श्रद्धा असणारे प्रभुदास भोईर यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रिन्स आणि कनिष्ठ सुपुत्र जियांश या दोघांचाही जन्मदिन एकाच दिवशी येतो. श्री गणरायाचे आगमन झालेले असताना दिवसात त्यांचा जन्मदिवस येणे हा एक दुर्मिळ योग यंदाचे वर्षी उजळून आला. दोन्ही सुपुत्रांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी प्रभुदास भोईर व त्यांच्या कार्यकर्ते मंडळींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार बाळाराम पाटील दोन्ही मुलांना जन्मदिनानिमित्त शुभाशिर्वाद देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकरी कामगार पक्षाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटनेचे राज्य प्रमुख प्रभुदास भोईर म्हणाले की माझी गणपती बाप्पा वरती अपार श्रद्धा आहे. आणि गणपती बाप्पाचे माझ्यावर कायमच आशीर्वाद असतात. माझ्या दोन्ही मुलांचा जन्मदिन एकाच दिवशी येणे हे निव्वळ गणपती बाप्पाची कृपा आहे.

जन्मदिनाच्या दिवशी सकाळपासून धार्मिक विधींच्या प्रसन्न वातावरणात श्री गणपती पूजन व श्री सत्यनारायण पूजन संपन्न झाले. त्यानंतर कीर्तन प्रवचन भजन अशा भक्तिमय वातावरणात भक्तगण न्हाऊन निघाले. महाप्रसादाचे आयोजन या निमित्ताने केलं होतं.

सायंकाळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जियांश आणि प्रिन्स यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव करण्यात आला. केक कटिंग सेरेमोनीच्या वेळेस शेकाप नेत्या सरस्वती काथारा, डॅशिंग युवा नेतृत्व झाकीर खान आणि त्यांचे उत्साही सहकारी, शिवसेना नेते विश्वनाथ मस्कर, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश शेठ भोईर यांच्यासह आप्तेष्टमंडळी हितचिंतक कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment